तरुण भारत

अनंतनागमध्ये 6 वर्षाच्या मुलाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भारतीय जवानासह सहा वर्षाच्या मुलाची हत्या करण्याऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि विशेष मोहीम पथकाला यश आले. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. 

Advertisements

26 जून रोजी अनंतनाग येथील सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. आणि शेजारी कारमध्ये झोपलेल्या निहान या सहा वर्षाच्या मुलांचाही गोळी लागून मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पोलिसांनी दहशतवादी झाहिदचा फोटो प्रसिद्ध केला होता.

झाहीद हा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य होता. मंगळवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी झाहीदसह तीन दहशतवाद्यांना घेरले होते. मात्र, ते पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर गुरुवारी रात्री झाहीदचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि विशेष मोहीम पथकाला यश आले.

Related Stories

नवा उच्चांक! 24 तासात 1.15 लाख बाधितांची नोंद

datta jadhav

लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी

prashant_c

प्रदूषणरहित इंधनाचा वापर करणार रेल्वे

Patil_p

गुजरात सरकारने बदलले ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव

Rohan_P

श्रीलंकेशी केलेला पेट्रोलियम करार कायम

Patil_p

पश्चिम बंगालमध्ये मूर्ती विटंबनेमुळे तणाव

Patil_p
error: Content is protected !!