तरुण भारत

केंद्रिय कर्मचाऱ्यांना आता लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी : आशिष शेलार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनामुळे देशभरातील रेल्वे सेवा सध्या बंद आहे. केवळ अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान,  आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

Advertisements


मध्य रेल्वेने तसे एक पत्रक जारी केले आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 


ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आम्ही विनंती केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी त्यांनी दिली होती. त्यावर आता रेल्वेने अंतिम निर्णय जाहीर आज केला.

 
तसेच यावेळी शेलार यांनी शहा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांचे आभारही मानले आहेत.

Related Stories

ऍमेझॉनमुळे लाखो तरुण बेरोजगार : पियुष गोयल

prashant_c

कोल्हापूर : बिबटयाची तीन नखे, प्राण्याचे मांस जप्त

triratna

जम्मू-काश्मीर: सोपोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

triratna

जनता आमच्या बाजूने पण, आयोगाचा निकाल NDAच्या बाजूने : तेजस्वी यादव

Rohan_P

अफगाणिस्तानात ‘तहरीक-ए-तालिबान अमिरात’ची स्थापना

datta jadhav

डोंगराळ भागातील लढाईसाठी भारताकडे सर्वात मोठी आणि अनुभवी सेना; चिनी लष्करी तज्ज्ञांचा दावा

Rohan_P
error: Content is protected !!