तरुण भारत

पाकिस्तानमध्ये रेल्वे-बस अपघातात 19 शीख भाविकांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानच्या पंजाबमधील शेखूपुरा जिल्ह्यात शीख यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला रेल्वेची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात 19 शीख भाविक ठार झाले असून, 8 जखमी झाले आहेत. आज दुपारी ही घटना घडली. 

Advertisements

शेखपुरा जिल्ह्यात ज्या ठिकाणी हा अपघात झाला, त्या ठिकाणच्या रेल्वे क्रॉसिंगवर गेट नाही. त्यामुळे या क्रॉसिंगवरून 24 तास वाहनांची ये-जा सुरू असते. आज दुपारी अशीच वाहनांची वर्दळ असताना अचानक रेल्वे आल्याने रस्ता क्रॉस करणाऱ्या बसला रेल्वेची जोरदार धडक बसली. या धडकेत 19 जण जागीच ठार झाले तर 8 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Related Stories

अमेरिकेतील भारतीयांची भूमिका ठरणार महत्त्वाची

Patil_p

ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा डाव – हंसराज अहिर

Abhijeet Shinde

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखांचा टप्पा

datta jadhav

सहकार खातं अमित शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही – संजय राऊत

Abhijeet Shinde

कोरोनाबाधित मुलांना रेमडेसिवीर,स्टेरॉइड नको; केंद्राकडून नव्या गाईडलाईन जारी

Rohan_P

भारताला लवकरच मिळणार एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली

datta jadhav
error: Content is protected !!