तरुण भारत

स्वदेशी जिओ मिटद्वारे 100 जणांना एकत्रित बैठकीची सोय

झूम, गुगल मीट, हँगआउट, मायक्रोसॉफ्ट टीम, स्काइपसोबत राहणार टक्कर

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

दूरसंचार क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केलेल्या रिलायन्स च्या जिओ प्लॅटफॉर्मने जिओ आयटी सेवांमध्ये आपला गडद ठसा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून जिओने आता जिओ मीट व्हिडीओ कॉलिंग ऍप सादर केले आहे. परंतु या ऍपची आता बाजारात झूम, गुगल मीट, हँगआउट, मायक्रोसॉफ्ट टीम, स्काइप यासारख्या व्हिडीओ कॉलिंग ऍपसोबत चांगलीच टक्कर रंगणार आहे.

जिओ मीटला गुगल पे स्टोअर आणि ऍपल आयओएस ऍप स्टोअरवरुन डाऊनलोड करण्यात येणार असल्याचे जिओने सांगितले आहे. कंपनीचे सदर ऍप बाजारात उतरण्यासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओच्या माध्यमातून होणाऱया बैठका आणि अन्य संवादांसाठी व्हिडीओ ऍपचा वापर अतिशय वेगाने वाढत गेला आहे. यामुळे स्वदेशी ऍपचा नक्कीच देशातील जनतेला लाभ घेता येणे शक्मय होणार असल्याचे अभ्यासक म्हणत आहेत.

जिओ मीटची सुविधा

सदरच्या ऍपवरुन एकाच वेळी 100 लोकांना एकाच वेळी व्हिडीओ कॉलिंगची सुविधा प्राप्त होणार आहे. यासाठी कोणत्याही कोडची आवश्यकता भासणार नाही आहे. याला डेस्कटॉपच्या मदतीने वापरता येणार आहे. 

Related Stories

सर्वेक्षण अहवालानंतर बाजार कोसळला

Patil_p

एअरटेलची प्लॅटिनम ग्राहकांसाठी खास योजना

Patil_p

गोल्ड स्टॉक एक्सचेंजचा मार्ग मोकळा

Patil_p

‘आयफोन 13 मिनी’चा फोटो लिक

Patil_p

एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बाजारात घसरण

Patil_p

क्षेत्रीय ग्रामीण बँकांना चालू आर्थिक वर्षात 2,206 कोटीचा तोटा

Patil_p
error: Content is protected !!