तरुण भारत

देशाचा चीनसोबतचा व्यापार घटला

चिनी साहित्यावर बहिष्काराचा प्रभाव : इलेक्ट्रिक साहित्यच अधिक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

चीनसोबत तणावाचे वातावरण सुरु असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. याचा परिणाम आता सीमा संघर्षासोबत दोन्ही देशाच्या व्यापारावर होत आहे. देशाला चीनसोबत होणाऱया व्यापारात घट करण्यात काही प्रमाणात यश मिळाले असल्याचे दिसून येत आहे. व्यापारी वर्ष  2019-20मध्ये चीनसोबतचा भारताचा व्यापार घटून 48.66 अब्ज डॉलर्सवर (जवळपास 3.6 लाख कोटी रुपये) आला आहे. याच दरम्यान चीनला भारताने 16.6 अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे तर भारताने 65.26 अब्ज डॉलर्सची चीनकडून आयात केली असल्याची माहिती सरकारी आकडेवारीमधून देण्यात आली आहे.

व्यापारी वर्ष 2018-19 मध्ये भारताने चीनसोबत व्यावसायिक तोटा 53.56 अब्ज डॉलर्सचा झाला होता आणि 2017-18 मध्ये हा तोटा 63 अब्जवर राहिला होता. घडय़ाळ, म्युझिकचे साहित्य, खेळणी, खेळाचे साहित्य, फर्निचर, मॅटेस, प्लास्टिक्स, इलेक्ट्रिकल मशीन, इलेक्ट्रिक उपकरणे, रसायन, लोखंड व स्टीलचे साहित्य, खनिज इंधन आणि धातू या गोष्टी प्रामुख्याने चीनकडून आयात केल्या जातात.

सरकार चीनसोबत व्यापारी तूट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. देशामध्ये कमी किमतीत देण्यात येणाऱया चीनच्या विविध साहित्यावर सरकारने अँटी डंपिंग शुल्क लावले आहे. परंतु देशातील उद्योगाला स्वस्त आयातीच्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचेही म्हटले आहे.

 आयातीमध्ये चीनचा हिस्सा

चीनसोबत भारतामध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक घटून 2019-20 मध्ये 16.378 कोटी डॉलर्सवर पोहोचली आहे. 2018-19 मध्ये हा आकडा 22.9 कोटी डॉलर्सवर राहिला होता. 2017-18 मध्ये ही गुंतवणूक 35.022 कोटी डॉलर्सवर राहिली आहे.

Related Stories

5-जी बाजारपेठेची उलाढाल 31 लाख कोटी डॉलर्सवर?

Omkar B

रत्न, दागिने निर्यात घटली

Patil_p

सिंगापूरचा जीडीपी 41.02 टक्क्मयांनी घसरला

Patil_p

जेके टायरचा आता हॅण्ड सॅनिटायझयर

Patil_p

ब्रेकथ्रूमध्ये रिलायन्स 372 कोटी गुंतवणार

Omkar B

कल्याण ज्वेलर्सच्या नफ्यामध्ये वाढ

Patil_p
error: Content is protected !!