तरुण भारत

चिनी मोबाईल कंपन्यांचे उत्पादन घसरले

नवी दिल्ली

 शोओमी, ओप्पो, वीवो आणि रियलमी यासारख्या चिनी कंपन्यांच्या हजारो कोटी रुपयांच्या स्मार्टफोन्सच्या उत्पादनावर यावेळी भारत-चीन सीमा संघर्षामुळे मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. या कारणामुळे चीनकडून येणाऱया मालाची भारतीय सीमेवर सक्तीने पडताळणी केली जात असल्याने पुरवठय़ात मोठय़ा प्रमाणात घट होत गेली आहे.

Advertisements

दुसऱया बाजूला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या कारणाने कामगारांची संख्याही कमी आहे. यामुळेही मोबाईल उत्पादन मोठय़ा प्रमाणात प्रभावीत होत कोरोनाच्या अगोदरच्या परिस्थितीपेक्षा जवळपास 30 ते 40 टक्के स्मार्टफोन्सचे उत्पादन घटले आहे.

कंपन्यांच्या अधिकाऱयांसोबत चर्चा करण्यात येत असून बंदरावरील अडकून पडलेले साहित्य काढून घेण्यासाठी व ते कंपन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरु आहे. साहित्य बंदरात अडकले असल्याने चिनी कंपन्यांच्या वरि÷ अधिकाऱयांच्या माहितीनुसार त्यांचा जास्तीत जास्त वेळ सामानाचा पुरवठा करण्यात जात असल्याने उत्पादन घटण्यावर परिणाम होत आहे.

महिन्याअखेर उत्पादन 80 टक्क्मयांवर

चालू महिन्याच्या अखेर उत्पादन 80 टक्क्मयांवर येणार आहे. कारण याच कालावधीत जर सुटय़ा भागांचा पुरवठा करणाऱया गोष्टी सामान्य झाल्यास हे उत्पादन 80 टक्क्मयांवर येणार असल्याचे इंडियन सेल्यूलर ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे चेअरमन पंकज मोहिंदू यांनी म्हटले आहे.

Related Stories

तिसऱया दिवशी सेन्सेक्स 163 अंकांनी वधारला

Omkar B

बलदेव प्रकाश यांची जम्मू काश्मीर बँकेच्या एमडीपदी नियुक्ती

Patil_p

झोमॅटो, नायका, पेटीएम बनले लार्जकॅप समभाग

Patil_p

48 मेगापिक्सलचा आयफोन 14 प्रो लवकरच

Amit Kulkarni

मारूतीची नवी कार घ्या आता हप्त्यावर

Omkar B

जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पाचव्या स्थानी

datta jadhav
error: Content is protected !!