तरुण भारत

हिरो इंडियन खुली गोल्फ स्पर्धा रद्द

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीमुळे भारतात होणारी हिरो पुरस्कृत इंडियन खुली गोल्फ स्पर्धा रद्द केल्याची घोषणा शुक्रवारी स्पर्धा आयोजकांनी केली आहे. युरोपियन गोल्फ टूर अंतर्गत ही स्पर्धा यावेळी भारतात घेतली जाणार होती. सदर स्पर्धा गुरगाव येथे 19 ते 22 मार्च दरम्यान आयोजित केली होती. पण कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा काही दिवसांपूर्वी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisements

कोरोना संकटामुळे महिलांची इंडियन खुली गोल्फ स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय गेल्या मंगळवारी घेण्यात आला होता. या स्पर्धेपेक्षा गोल्फपटूंच्या आरोग्याच्या काळजीला आपण अधिक प्राधान्य देत असल्याने 2020 सालातील इंडियन खुली पुरुषांची गोल्फ स्पर्धा रद्द करण्यात आल्याची माहिती भारतीय गोल्फ संघटनेचे चेअरमन देवांग शहा यांनी दिली. सदर स्पर्धा युरोपियन गोल्फ टूर अंतर्गत असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे शहा यांनी म्हटले आहे. दिवसेंदिवस भारतातील कोरोना परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आता हिरो इंडियन खुली गोल्फ स्पर्धा 2021 साली घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

लंकेचा सलामीचा सामना आज बांगलादेशविरुद्ध

Patil_p

मुंबई इंडियन्सला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

मुंबई संघाचा सलग तिसरा पराभव

Patil_p

स्टोक्सची भारतीय मालिकेतून माघार

Patil_p

मोहम्मद सिराजला पितृशोक, तरीही दौऱयात कायम राहणार

Patil_p

संजिता चानूला मिळणार अर्जुन पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!