तरुण भारत

दबाव वाढल्यानेच पर्यटन सुरू करण्याचा निर्णय

प्रतिनिधी/ पणजी

पर्यटनाशी संबंधित उद्योगांकडून दबाव वाढू लागल्याने पर्यटन व्यावसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पर्यटन हा राज्याचा आर्थिक स्रोत आहे. विदेशी पर्यटक गोव्यात येणार नाहीत. त्याचबरोबर अन्य सर्वच राज्यांमध्ये आंतरराज्य वाहतुक सुरू आहे. लोकांना नोकऱया हव्या आहेत, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व पक्षांच्या एकमताने विधानसभा अधिवेशन एक दिवसाचे घेण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisements

पर्यटन सुरू करताना त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही (एसओपी) निश्चित केली आहेत. गोव्यात कोरोना प्रकरणे वाढत असली तरी नियंत्रणात आहेत. अन्य राज्यांच्या मानाने गोव्यात कोरोना चाचणीचे प्रमाणही जास्त आहे. चाचण्या वाढल्या म्हणजे रुग्ण वाढणारच, पण आरोग्य खाते चांगले काम करीत आहे असेही ते म्हणाले.

आर्सेनिक औषधे प्रत्येक घरात पोहोचवणार

गुरुवारी सर्वाधिक 95 रुग्ण सापडले. जे कारोना पॉझिटिव्ह सापडतात त्याना कोविड इस्पितळात पाठविले जाते. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी आयुषमंत्रालयाच्या मदतीने आर्सेनिक औषधे गावोगावी प्रत्येक घरात देण्यात येणार आहेत. त्यामुळे शरीरातली प्रतिकार शक्ती वाढणार आहे. सर्व आमदार, सरपंच, पंच यांच्यामार्फत हे औषध घरोघरी पाठविण्यत येणार आहे. आयुषमंत्रालयाने त्यासाठी मान्यताही दिली आहे, असेही ते म्हणाले.

क्वारंटाईनसाठी ज्यादा पैसे घेत नाहाr

गोव्यात क्वारंटाईन पर्यटन सरकारला करायचे नाही. आमदार विजय सरदेसाई यांना जसे वाटते तसे ते बोलतात. सरकार कुणाकडूनही क्वारंटाईनसाठी जास्त पैसे आकारत नाही असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यानी सांगितले. कोरोनाची बाधा झालेल्या सरकारी कर्मचाऱयांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. फोंडा पोलीस स्थानकातील कोरोनाबाधित पोलिसांना मडगाव रेसिडन्सीमध्ये ठेवले होते. पहिल्या दिवशी थोडी गडबड झाली. मात्र आपण पोलीस महासंचालकाशी बोलल्याचे ते म्हणाले.

Related Stories

साष्टीवाडा बोर्डे येथे गेरेजवर झाड पडल्याने नुकसान

Omkar B

सागरी संपत्ती ही गोव्यासाठी सोन्याची खाण

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यातील रुग्णांना ‘दिलासा’ नाहीच !

Patil_p

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात

Sumit Tambekar

फातोडर्य़ात आज शेवटच्या स्थानावर असलेल्या ओडिशाची लढत ब्लास्टर्सशी

Amit Kulkarni

मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेची आज घोषणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!