तरुण भारत

कर्नाटक: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आशा कर्मचाऱ्यांच्या कामाचे केले कौतुक

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना काळात आशा कर्मचारीही मोठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सेवा, अपुरी सुरक्षा उपकरणे व त्यांना देण्यात येणारे मानधनात उशिरा मिळत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी अधिकृत आशा सेविकांचे कोरोना काळात निभावत असलेल्या त्यांच्या भूमिकेचे आणि कार्याचे कौतुक केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने आशा कर्मचार्‍यांचे कौतुक करताना म्हंटले आहे की, आशा कर्मचारी कर्नाटकमधील कोरोना विषयी घरगुती सर्वेक्षणात सक्रियपणे भाग घेत आहेत. त्याचबरोबर आंतरराज्य प्रवासी, प्रवासी कामगार आणि समाजातील इतरांची कोरोना तपासणी करीत आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “ एका विशिष्ट वयोगटात आढळणारे कोरोनाचे रुग्ण आणि त्याविषयी असणारी भीती ओळखून वृद्धांसमवेत असलेल्या कुटूंबांची, आणि अन्य काही विकार असणाऱ्या जवळपास १.९ कोटी लोकांची घरोघरी जाऊन तपासणी केली आहे.

Advertisements

Related Stories

लोकमान्य महाद्वार रोड शाखेचे नव्या जागेत स्थलांतर

Patil_p

मच्छेत बाल शिवाजी वाचनालयाचा वर्धापनदिन उत्साहात

Omkar B

केपीटीसीएल गाळय़ांसाठी आज लागणार बोली

Patil_p

एम. तिम्मापूर येथील 22 शाळकरी मुलांना कोरोना

Patil_p

चंद्रकांत बांडगी यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p

कोल्हापूर-बेळगाव पेट्रोल दरात 6 रुपयांची तफावत

Patil_p
error: Content is protected !!