तरुण भारत

बार्शी तहसील कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

प्रतिनिधी / बार्शी

कोराेना संसर्ग झालेली ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचा शासकीय नियम आहे. बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये विविध प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून जाहीर झाले आहेत. आता या तावडीतून सरकारी कार्यालय सुद्धा सुटत नाहीत. आता बार्शी तहसील कार्यालयात कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाले आहे खुद्द तहसील कार्यालयात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने येथून पुढे 14 दिवस तरी सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे अनेक नागरिकांची कामे थांबली असून तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही घरूनच काम करण्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements

बार्शी तहसील कार्यालयात असणारे उपकारागृह येथील अकरा कैदी यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. या सर्व 11 कैदींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बार्शी तहसील कार्यालय आज बार्शी नगर परिषदेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाले आहे. याच कारागृहात अजून 14 कैदी असून त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या बाकी कैद्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून त्यांची रोज दोन वेळेस तपासणी केली जात आहे.

Related Stories

आंदोलनप्रकरणी 74 शेतकऱ्यांवर गुन्हे

datta jadhav

दर्पण पुरस्कार वितरण तरुण भारत प्रतिनिधी प्रा.रमेश आढाव यांचा पुरस्कारात समावेश

Patil_p

बाधित वाढ मंदावतेय, मृत्यूदराचा आलेख खाली

Amit Kulkarni

फलटणमध्ये ओबीसी बांधवांचा तहसील कचेरीवर मोर्चा

datta jadhav

साताऱयात चोरटय़ाकडून 50 मोबाईल हस्तगत

Patil_p

भाविकांविना पार पडला खंडोबा-म्हाळसा विवाह सोहळा

Patil_p
error: Content is protected !!