25 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

सातारा : कोरोनाच्या सावटाखाली बेंदूर साधेपणाने साजरा

प्रतिनिधी / सातारा

साताऱ्यात दरवर्षीप्रमाणे यंदा कोठेही बंदुराचा उत्साह दिसला नाही, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणतीही मिरवणूक, ढोल-ताशा काही करता येत नसल्याने तरुणानांमध्ये नाराजी दिसत होती.

मात्र, सातारा शहरात गेली अनेक वर्षे खिल्लारी बैलांसाठी परिचित असलेले राजेंद्र गिरीगोसावी यांनी आज त्यांचा घरा जवळच कोणतीही मिरवणूक न काढता साधेपणाने बैलांची पूजा करून बेंदूर साजरा केला, त्या वेळी तुतारी, संभाळाचा नादामध्ये शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वाईकर साहेब यांचा हस्ते रंगविलेल्या खिल्लारी बैलांचे पूजन करण्यात आले तर महिलांनी बैलांना नैवेध दाखविला.

राजेंद्र गिरीगोसावी यांच्या खिल्लारी बैलजोडीला संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी ओढण्याचा मान गेली अनेक वर्षे मिळत असून त्याची मिरवणूक ही त्याच पद्धतीने भव्य असते मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी घरीच पूजा करण्यात आली.

Related Stories

सातारा : दूध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यात अनुदान मिळावे

triratna

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

Patil_p

कोल्हापूर : जुगार अड्यावर छापा, 11 लाख 43 हजाराचा मुद्देमाल जप्त

triratna

सातारा : दरावस्तीच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांसाठी केले ‘हे’ उल्लेखनीय काम

triratna

सातारा : मंदीरे खुली करण्यासाठी भाजपच्या वतीने करहर येथे रास्तारोको

triratna

तेजस जाधव खूनप्रकरणातील चार संशयितांवर मोक्का

tarunbharat
error: Content is protected !!