तरुण भारत

चीनमध्ये महापूर; गर्भवतीने वाहत्या पाण्यात टायरवर दिला बाळाला जन्म

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

मागील आठवड्यापासून चीनमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने 8 राज्यातील 110 नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशाच परिस्थितीत युन्नान प्रातांत एका गर्भवती महिलेने वाहत्या पाण्यात टायरवर मुलाला जन्म दिला आहे. चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

चीनमधील युन्नान प्रातांत मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, लोकांना घराबाहेर पडता येत नाही. अशाच परिस्थितीत युन्नानमधील एका गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहचू शकत नसल्याने स्थानिकांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रसूतीसाठी तिला टायरवर बसवून वाहत्या पाण्यातून रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, वाटेतच या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला. 

दरम्यान, या महिलेला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्यानंतर युन्नानच्या एका रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सध्या बाळ आणि बाळंतीन दोन्ही सुखरूप आहेत. गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि प्रसुतीदरम्यान नागरिकांनी घेतलेल्या काळजीचे कौतुक होत आहे. तर पाण्यात जन्म झाल्यामुळे या मुलाचे नाव शूइशेंग असे ठेवण्यात आले आहे. 

Related Stories

हायड्रॉक्सी क्लोरोक्विनला ‘संजीवनी बूटी’ची उपमा

Patil_p

अमेरिकेच्या सीडीसीने पुन्हा बदलली मागदर्शक तत्वे

Omkar B

देशात 1 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p

श्रीलंकेत जेलमध्ये दंगल; 8 कैद्यांचा मृत्यू

datta jadhav

चव बिघडणे, गंधक्षमता गमाविणे

Patil_p

5 महिन्यांकरता विकसित होते इम्युनिटी

Omkar B
error: Content is protected !!