तरुण भारत

तज्ञ डॉक्टरांची समिती सोलापुरात दाखल

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

सोलापूर शहरासाठी तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्त समिती आली असून तीन आठवडे थांबणार आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी उपचार पद्धती निश्चित करणार आहे.

राज्य शासनाच्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुण्याच्या बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ.शशिकला सांगळे,सदस्य म्हणून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.व्यंकटेश जोशी आणि नांदेडच्या श्री.शं.च.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.विजय कापसे यांचा समावेश आहे.समितीमधील डॉक्टर औषधवैद्यकशास्त्र,बधिकरणशास्त्र आणि छाती व क्षयरोगशास्त्राचे तज्ञ आहेत.ही समिती सोलापूर येथील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढत्या मृत्यूदराची समिक्षा करणार आहे. कोविड रूग्ण असणाऱ्या दवाखान्यांना भेटी देऊन उपचार पद्धतीची माहिती घेणार असून ते योग्य प्रमाणित उपचार पद्धती निश्चित करणार आहेत. ही समिती तीन आठवडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि कोविड रूग्णालयांना भेटी देणार आहेत.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात महिनाभरात १० हजार ९२९ नवे कोरोना रुग्ण

triratna

सोलापूर : प्रशासनाची परवानगी नाही; पण यात्रेची जय्यत तयारी

triratna

सोलापूर जिल्हा परिषदेतील १० हजार कर्मचाऱ्यांची सेवापुस्तक अद्ययावत

triratna

डॉ.गौतम छाजेड, जावेद खान यांना नादब्रह्म पुरस्कार जाहीर

pradnya p

खर्डीत चोरट्यांनी फोडली दुकाने

triratna

कोल्हापुर ते मुझफ्फरपुर साप्ताहिक किसान रेल धावणार

triratna
error: Content is protected !!