तरुण भारत

हनोई येथे सुरू झाले जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल

ऑनलाईन टीम / हनोई : 

व्हिएतनामची राजधानी हनोई येथे एक भव्य गोल्ड प्लेटेड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलच्या भिंती, फर्निचर, भांडी, प्लेट, कप, शोभेच्या वस्तू, तसेच बाथटब आणि कमोड यासारख्या वस्तूंनाही गोल्ड प्लेटिंग करण्यात आले आहे. गोल्डप्लेटिंग करण्यात आलेले हे जगातील पहिले हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Advertisements

‘डोल्स हनोई गोल्डन लेक’ असे या हॉटेलचे नाव आहे. 
या हॉटेलची लॉबी 24 कॅरेट गोल्डपासून तयार करण्यात आली असून, यासाठी 200 मिलियन डॉलर खर्च करण्यात आला आहे. या हॉटेलमधील बहुतांश वस्तू गोल्ड प्लेटेड आहेत. इथला स्विमिंग पुलही सोन्याने मढवलेला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरला सोन्याच्या कपात कॉफी दिली जाते. 

हनोईच्या मधोमध असलेल्या या 25 मजली हॉटेलमध्ये एकूण 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतीवर 54 हजार चौरस फुटांची गोल्ड प्लेटेड टाईल्स लावलेली आहे. हॉटेलच्या टेरेसवर इन्फिनिटी पूल बनवण्यात आलेला आहे जेथून हनोई शहराचे विहंगम द‍ृश्य पाहता येते. हॉटेलमधील प्रेसिडेन्शियल सुईटमध्ये वन नाईट स्टे साठी 4.85 लाख रुपये, डबल बेडरूम सुईटमधील स्टेसाठी 75 हजार रुपये आहे. 

हॉटेलचे चेअरमन हू दोंग म्हणाले, होआ बिन ग्रुप अँड विनधम ग्रुपने हे हॉटेल बनवले आहे. ग्रुपमधील एका फॅक्टरीमध्ये गोल्ड प्लेट बनवण्याचे काम केले जाते. त्यामुळे त्यांना हॉटेलसाठी फर्निचर आणि इतर वस्तू बनवण्यासाठी कमी खर्च आला. 2009 मध्येेे या हॉटेलच्या उभारणीला सुरुवात झाली. 2 जुलैला या हॉटेलचे उद्घाटन झाले.

Related Stories

हास्यवायूने दूर होणार नैराश्य

Amit Kulkarni

श्रीलंकेत आर्थिक आणीबाणी लागू

Amit Kulkarni

अखेरच्या दिवसांसाठी ब्रिटनच भारी

Patil_p

इस्रायल : उच्चांकी रुग्ण

Patil_p

जगभरातील कोरोना बळींची संख्या 65 हजारांवर

prashant_c

हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

datta jadhav
error: Content is protected !!