तरुण भारत

सांखळी इस्पितळातील 9 जण क्वारंटाईनमध्ये

प्रतिनिधी/ पणजी

सांखळी इस्पितळातील त्या परिचारिकेच्या पतीचा अहवाल देखील निगेटिव्ह आलेला असून एकाच दिवशी सांखळीमध्ये 327 आणि फोंडय़ातील 300 पेक्षा जास्त जणांची चाचणी घेण्यात आल्याने अहवाल हाती येण्यास उशीर झाला. यामध्ये त्या परिचारिकेचा कोणताही दोष नव्हता, असे स्पष्टीकरण सांखळी इस्पितळातील आरोग्याधिकाऱयांच्यावतीने करण्यात आले.

Advertisements

प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने डॉक्टरनी सांगितले की, सांखळीमध्ये मोठय़ा प्रमाणात रुग्णांची कोविड चाचणी दि. 1 जुलै रोजी घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याच दिवशी फोंडा पोलीस स्थानकाच्या अनुषंगाने तेथूनही मोठय़ा प्रमाणात नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याने साहजिकच एक दिवस विलंबाने अहवाल हाती आला आणि त्यात परिचारिका ही पॉझिटिव्ह सापडली. त्यानंतर तिला त्वरित मडगाव येथे कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले. त्याशिवाय दि. 1 रोजीच परिचारिकेच्या पतीचे देखील नमुने तपासणीसाठी घेतले असता त्याचा अहवाल देखील काल आला व त्यात त्याला बाधा नसल्याचे स्पष्ट झाले. या दरम्यान परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना अर्थात सांखळी इस्पितळातील कर्मचाऱयांना कोरंटाईनसाठी एका स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्यांची सोमवारी पुनर्चाचणी घेऊन त्यांचा अहवाल नकारात्मक आल्यानंतरच त्यांना सेवेत घेतले जाईल असे ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकरणात परिचारिकेची चूक नसून कोविडच्या या प्रकरणात सातत्याने वैद्यकीय सेवेत सेवा बजावणाऱया या कोविड वॉरियर्सचे कौतूक होणे गरजेचे आहे, असे डॉ. पुढे म्हणाले.

Related Stories

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्लाझ्मा बँक

Patil_p

तृणमुलचा गोवा प्रवेश संशयास्पद : काँग्रेस

Amit Kulkarni

श्रावणात जाईचा सुगंध दरवळलाच नाही…

Patil_p

अखेर कोरोनाचे दोन बळी

Omkar B

मशीनमध्ये हात अडकून कामागार जखमी

Patil_p

सुर्ल सिद्धेश्वर नवदुर्गा देवस्थानचा कालोत्सव उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!