तरुण भारत

वास्कोत सहा वाहनांवर वृक्ष कोसळला

प्रतिनिधी/ वास्को

वास्कोतील कदंब बस स्थानकाजवळील एका इमारतीसमोरील वृक्ष कोसळून तीन मिनी बसगाडय़ांसह सहा वाहनांचे नुकसान झाले. त्यात वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले तर दोघे किरकोळ जखमी झाले.

Advertisements

वास्कोतील मुंडवेल वाडे भागातील कदंब बस स्थानकापासून काही अंतरावर शनिवारी सकाळी ही घटना घडली. या ठिकाणी एका इमारतीसमोर भला मोठा जुना वृक्ष होता. गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा वृक्ष उन्मळून खाली कोसळला. तेथील इमारतीसमोर व या वृक्षाखाली तेथीलच मालकाच्या तीन मिनी बसगाडय़ा होत्या. तसेच अन्य दोन कार व एक जेसीबी वाहन होते. या वाहनांवर तो वृक्ष कोसळल्याने सर्व वाहनांचे नुकसान झाले. त्या वृक्षाखाली एक बस पूर्णपणे चिरडली गेली. दुसऱया बसचीही बऱयाच प्रमाणात हानी झाली. अन्य एक बस व दोन कार तसेच जेसीबीचीही या घटनेत हानी झाली. या घटनेतील नुकसानीचा निश्चित आकडा संध्याकाळपर्यंत स्पष्ट झाला नव्हता. मात्र, ही नुकसानी लाखोंच्या घरात आहे. वृक्ष कोसळलेल्याच ठिकाणी भाजी विक्रीचा एक गाडा आहे. सुदैवानेच हा गाडा बचावला. या घटनेत दोघांना दुखापत झाली.

वाहतुकीची कोंडी भाजी विक्रीचा गाडा सुदैवाने बचावला

ही घटना मुख्य रस्त्याशेजारीच घडल्याने सुरळीत वाहतुकीवरही परिणाम झाला. दुपारी दोन वाजेपर्यंत चिखली ते वास्को शहरातील सेंट ऍड्रय़ू चर्चपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली. हा वृक्ष कोसळल्यानंतर जवळच असलेल्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली. सदर वृक्ष कापून त्या परिसरात निर्माण झालेला अडथळा दूर करण्याच्या कार्यात अग्निशामक दल शनिवारी रात्री उशिरापर्यंत व्यस्त होते. वास्को पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

Related Stories

भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाच्या महसुलावर परिणाम

Amit Kulkarni

कणबर्गी येथे श्री चांगदेव उर्फ राजाबागसवार यात्रोत्सव 1 पासून

Patil_p

काकती सर्व्हिस रस्त्यावर वाहनांची वर्दळ

Omkar B

या महिन्यातील रेशनचे वाटप 5 जून पासून

Patil_p

रोहयोच्या कामगारांना शिवाजी कागणीकरांकडून मार्गदर्शन

Patil_p

सज्जता नाताळ सणासाठीची

Patil_p
error: Content is protected !!