तरुण भारत

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी प्लाझ्मा बँक

प्रतिनिधी/ पणजी

कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाज्मा बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लाज्मा थेरपी उपचारासंदर्भात चर्चा केल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर तसेच डॉ. अनार, डॉ. सावियो, डॉ. वाईपमन व डॉ. मल्ल्या यांच्याशी चर्चा केली. कोरोना रुग्णांवर प्लाज्मा थेरपी उपचार करण्याबाबत यावेळी महत्त्वपूर्ण अशी चर्चा करण्यात आली. कोरोनापासून मुक्त झालेल्या रुग्णांमधून प्लाज्मा गोळा केला जाणार आहे व त्याचा उपयोग कोरोनामुळे अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाणार आहे. कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर 14 दिवस थांबून म्हणजे 28 दिवसांनंतर प्लाज्मा दान करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात आयसीएमआरकडे प्लाज्मा बँकिंग व प्लाज्मा थेरपीबाबत प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

तांत्रिक प्रक्रियेसाठी एक तज्ञांची समिती

प्लाज्मा ट्रान्सफ्युजन मेडिसीन विभाग चालविण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर व्यवस्थापकीय संचालक व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. तांत्रिक प्रक्रियेसाठी व कोविड इस्पितळावरील नोंदीवर लक्ष ठेवण्यासाठी एक तज्ञांची समितीही स्थापन केली जाणार आहे. सुरुवातीला 4000 प्लाज्मा पॅकेटचा साठा करणे शक्य असल्याचे राणे यांनी सांगितले. प्लाज्मा पॅकेट साठविण्यासाठी दोन ब्लड प्लाज्मा फ्रीझर घेण्यात येणार आहेत.

आरोग्य खाते व डॉक्टरांच्या प्रयत्नांची शिकस्त

18 ते 60 वयोगटातील रुग्ण जे कोरोनामुक्त होतात ते आपला प्लाज्मा दान करू शकतात. जेणेकरून अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे. कोरोनापासून रुग्णांना मुक्त करण्यासाठी व कोरोनाबाधित रुग्णांना मृत्यूपासून रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाविरोधी लढा सुरूच असून आरोग्य खाते व डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करीत असल्याचेही विश्वजित राणे यांनी सांगितले.

Related Stories

कंटेनमेंटमधून मुक्त करा, अन्यथा 3 ऑगष्टपासून बेमुदत उपोषण, मांगोरहिलमधील लोकांचा ईशारा, दोन दिवसांत होतात दोन महिने पूर्ण

Omkar B

1.20 नव्हे, 2.70 कोटीची अफरातफर

Omkar B

गढूळ पाण्याच्या समस्येने सार्वजनिक पाणीपुरवठा खाते खडबडून जागे

Patil_p

तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे कोसळले

Omkar B

सासष्टीत काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का

Patil_p

गोळावली येथील पट्टेरी वाघाच्या घातपाताचा संशय बळावला

Patil_p
error: Content is protected !!