तरुण भारत

सातारा : कास तलाव ‘ओव्हर फ्लो’

परिसरात पावसाची जोरदार हाजेरी

वार्ताहर / कास

Advertisements

सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहु लागले असून सातारकरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर होऊन पुढील उन्हाळ्याचा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

कास परिसरात गेल्या महिनाभर आवकाळी पावसाच्या कोसळणाऱ्या जोरदार सरींमुळे तलावाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती तर गुरुवारपासुन कास परिसरात सतत पावसाची रिमझीम सुरु होऊन शनिवारी पावसाने जोरदार हाजेरी लावल्याने शनिवारी मध्यरात्री कास तलाव ओव्हर फ्लो होवुन पाणी सांडव्यावरून वाहु लागल्याने सातारकरांसाठी पुढील वर्षाचा पाणीसाठा पुर्ण क्षमतेने उपलब्ध झाला असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.

सातारा शहराचा वाढता पसारा व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नागरीकांना मुबलक पाणी मिळण्यासाठी पाणीसाठा होणाऱ्या कास तलावच्या भिंतीची उंची वाढवुन आताच्या पाणीसाठ्याच्या तिपटीने धरणात पाणीसाठा होण्यासाठी धरणाची भिंतीची उंची वाढविण्याचे काम गेल्या तीन वर्षापासुन प्रगती पथावर असुन ते ६०% हुन आधिक पुर्ण झाले असून आदयाप उर्वरीत काम बाकी असल्याने सातारकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी काही काळ आजुन वाट पाहावी लागणार आहे.

Related Stories

अन् शाहु कलामंदिर झाले रंगकर्मीच्या सेवेत दाखल

Patil_p

सातारा : औंध येथे पोलीस कर्मचाऱ्यासह पोलीस उपनिरीक्षकाच्या पतीस लाच घेताना अटक

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात दीडशे जणांची तपासणी, 22 जणांचे स्वॅब, 23 रिपोर्ट निगेटिव्ह

Abhijeet Shinde

OBC समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप : सचिन सावंत

Abhijeet Shinde

सातारा : अडचणीतल्या साखर उद्योगाला केंद्र सरकारचे धोरणच जबाबदार !

datta jadhav

नवीन वर्ष कसे साजरे करणार ? महाराष्ट्र सरकारकडून गाईडलाईन जारी!

Rohan_P
error: Content is protected !!