तरुण भारत

सातारा : वाढत्या आकडयाने भरतेय धडकी

● शुक्रवारी रात्री ५६ बाधित
● शनिवारी १० बाधित
● आजचे सर्वाधिक 4 बळी
● कडक लॉकडाऊनची गरज


प्रतिनिधी/सातारा

सलग चार दिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा हादरला आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हयात आत्ता कडक लॉकडाऊन राबवण्याची गरज आहे. शुक्रवारी रात्री ५६ तर शनिवारी १० कोरोना बाधित आढळल्याने सातारकरांना अक्षरशः धडकी भरली आहे. तसेच आज सर्वाधिक 4 बळीने भीती निर्माण होऊ लागली आहे. शनिवारी 5 जणांना मुक्त केल्याने कोरोना मुक्तांची संख्या 784 वर गेली आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 51, प्रवास करुन आलेले 4, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 1 असे एकूण 56 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 36 पुरुष व 20 महिलांचा समावेश आहे. तसेच खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

शुक्रवारी रात्री 56 बाधीत

शुक्रवारी रात्रीच्या अहवालात महाबळेश्वर तालुक्यातील लाखवड येथील 28 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील उंब्रज येथील 23 वर्षीय पुरुष, मुंढे येथील 41 वर्षीय पुरुष.
फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 7,12,16,38,68,42,40,32,20 वर्षीय पुरुष व 14 वर्षीय दोन युवती व 25 वर्षीय महिला मलठण येथील 39 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील पळशी रोड शिरवळ येथील 24 वर्षीय पुरुष, न्यू कॉलनी येथील 30 व 23 वर्षीय पुरुष, देशमुख आळी येथील 35 व 45 वर्षीय महिला, लोणंद मधील मऱ्याची वाडी येथील 34 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील जिहे येथील 49,36,20,8,6843,61,81,62 वर्षीय पुरुष व 42,57,4,30,19,3,10,32,70, 55 वर्षीय महिला, श्रीनाथ कॉलनी, फलटण रोड येथील 20 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील कुळकजाई येथील 25 वर्षीय पुरुष, धावली येथील 17 वर्षीय पुरुष, पानमळेवाळी येथील 43 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील मलवडी येथील 24 वर्षीय पुरुष, मोरगीरी येथील 33 वर्षीय पुरुष, कासरुंड येथील 35 वर्षीय पुरुष, चोपडी येथील 16 व 24 वर्षीय महिला, बेलवडे येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्यवंशीवाडी येथील 28 वर्षीय पुरुष, गोकूळ येथील 18 वर्षीय युवक, मारुल येथील 35 वर्षीय पुरुष.
वाई तालुक्यातील धर्मपूरी येथील 46 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

शनिवारी रात्री 10 बाधीत

शनिवारी कोरोना बाधितांमध्ये वाई तालुक्यातील उडतरे येथील 1, पसरणी येथील 1, वाई येथील 2.
सातारा तालुक्यातील बदेवाडी येथील 1, निनाम पाडळी येथील 1,कराड तालुक्यातील कार्वेनाका येथील 25 वर्षीय महिला, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष,खटाव तालुक्यातील शेणवडी येथील 26 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील वाझोली येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

चार बाधितांचा मृत्यू

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे काल खटाव तालुक्यातील मुंबई वरून प्रवास करून आलेला पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय ( सारीची रुग्ण ) महिला या 2 कोराना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. तसेच खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष व वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

शनिवारी
बाधीत 66
कोरोना मुक्त 5
बळी 4

शनिवार पर्यंत
एकूण बाधीत 1256
कोरोना मुक्त 784
एकूण बळी 55

Related Stories

आमदारांचं निलंबन एकतर्फी, विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

Abhijeet Shinde

अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकास मारहाण

datta jadhav

गायब कवटी पुन्हा सापडली

Patil_p

सुरक्षेच्या कारणास्तव मुद्रांक विक्री आठ दिवस बंद

Abhijeet Shinde

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटय़ाचा मृत्यू

Patil_p

लॉकडाऊन विरोधात व्यापारी रस्त्यावर

Patil_p
error: Content is protected !!