तरुण भारत

पाटगांव धरण ४६ टक्के तर कोंडूशी लघुप्रकल्प १०० टक्के पाणीसाठा

वार्ताहर / पाटगांव

पाटगांव मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन मुसळधार पाऊस पडत असून मौनी सागर जलाशयाच्या पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत असून धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरणात ४६ % पाणीसाठा झाला आहे तर कोंडूशी लघुप्रकल्प धरण १०० % भरले आहे यामुळे सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून पिण्याचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटणार आहे.

भुदरगड तालुक्यातील फये, कोंडूशी, मेघोली हे तीन लघुप्रकल्प असून यापैकी कोंडूशी पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून मोठया प्रमाणात विसर्ग होत आहे .पाटगांव परिसराला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून पाटगांव परिसरातील ओढे नाले तुडूब भरून वहात आहे . गेल्या चोवीस तासात पाटगांव धरण परिसरात सुमारे ९० मि.मि. पावसाची नोंद झाली आज अखेर १९०० मि.मि. पाऊस पडला पाटगांव मौनी सागर जलाशयातील पाणीसाठा ४७.२९द.ल.घ.मी. एवढा झाला असून कोंडूशी लघुप्रकल्पामध्ये ८९एम सी एफ टी साठा झाला आहे उर्वरीत फये लघुप्रकल्प ८.१६ %, मेघोली ३० % धरण भरले आहे.

Related Stories

नांदणीतील ‘त्या’ रुग्णाच्या संपर्कातील दोन नातेवाईक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

गोव्याच्या राजकारणाची सूत्र भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात – संजय राऊत

Abhijeet Shinde

राधानगरी एस टी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल व आगाराचे लाखोचे नुकसान

Sumit Tambekar

‘वारणा दूध संघास बिहारला मिल्क मिक्स कॉन्सनट्रेट दूध पुरवठा करण्याची ऑर्डर’

Abhijeet Shinde

मुंबईसह कोकणात जोरदार पावसाला सुरुवात

Rohan_P

कोल्हापूर शहरात कोरोनाने दोघांचा मृत्यू, 19 नवे रूग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!