तरुण भारत

लॉकडाऊननंतर चित्रीत झालेला ‘मनाचे श्लोक’ पहिला चित्रपट

लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळात कधीही न थांबणारी मनोरंजन सफष्टी थांबली होती. अनेक चित्रपट, मालिका, वेब सीरिज यांचे चित्रीकरण ठप्प झाले होते. सलग 3 महिने चित्रीकरण नाही म्हटल्यावर नवीन चित्रपटाचे प्रदर्शनही लांबणीवर गेले. आता मात्र अनलॉकमुळे मनोरंजन सफष्टी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. ऑनलाईन बिनलाईन, बघतोस काय मुजरा कर, मी पण सचिन अशा अनेक वेगळय़ा आशय विषयाच्या चित्रपटाची निर्मिती करणाऱया गणराज असोसिएट्सची आणि संजय दावरा फिल्म्सची निर्मिती असलेला मफण्मयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक या चित्रपटाचे जवळजवळ पूर्ण चित्रीकरण करून झाले होते. अवघ्या दोन दिवसांच्या आणि महत्त्वाच्या दृश्यांचे चित्रीकरण लॉकडाऊनमुळे राहून गेले होते. हे चित्रीकरण अनलॉक सुरू होताच चित्रपटाच्या टीमने पूर्ण केले.

लॉकडाऊनच्या काळात कलाकार चित्रीकरण कधी सुरू होईल याची वाट बघत होते. अनलॉकची घोषणा होताच अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी सज्ज झाले होते. मनाचे श्लोक या चित्रपटाचे सुद्धा असेच काहीसे झाले होते. या चित्रपटात मफण्मयी देशपांडे आणि राहुल पेठे यांची प्रमुख भूमिका आहे. अभिजित अब्दे यांनी या चित्रपटाचे छायाचित्रण केले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाच्या काही महत्वाच्या दृश्यांच्या चित्रिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रीकरण करणे शक्य झाले नाही. राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी देताच या चित्रपटाच्या टीमने नवीन आराखडा आखत चित्रीकरण पूर्ण करण्याचे ठरवले.

Advertisements

सरकारने चित्रीकरणाला परवानगी दिली आहे हे कळताच आम्ही सगळेच कामाला लागलो. चित्रीकरण स्थळाची संपूर्ण माहिती घेऊन मी जिल्हा अधिकाऱयांना भेटलो आणि सर्व नियम पाळून चित्रीकरण करणार आहोत हे त्यांच्या लक्षात आणून देत आम्ही परवानगी मिळवली असे चित्रपटाचे निर्माते श्रेयश जाधव यांनी सांगितले. उर्वरित चित्रीकरण कधी करता येईल हे माहितीच नव्हते. तरी नंतर वेळ घालवायचा नाही म्हणून अर्धी तयारी आधीच करून ठेवली होती. प्रत्येक गोष्टीची मांडणी कशी करता येईल यापासून ते कमी लोकांसोबत काम कसे करावे हे सुद्धा आम्ही प्लॅन करून ठेवले होते. म्हणून हे उरलेलं संपूर्ण चित्रीकरण दोन दिवसात संपवता आले असे मफण्मयी देशपांडे तिच्या या दुसऱया दिग्दर्शनीय अनुभवाविषयी सांगते. सरकारच्या नियमानुसार अवघ्या 35 टक्के टीममधल्या प्रत्येकाने तीन माणसांची कामे एकटय़ाने केली.

मुळशी रोडवरील गरुड माची या गावात चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर संपूर्ण गाव सॅनिटाईझ करण्यात आले. चित्रिकरणाच्या दरम्यान कलाकारांनी स्वत:चा मेकअप स्वत:च केला. याचबरोबर हे चित्रीकरण सुरू करण्याअगोदर सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी गावात पोहोचताच स्वत:हून काही दिवस क्वॉरंटाईन झाली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळत आणि त्याचबरोबर सॅनिटाइझेशन, ग्लोव्हज्, मास्क या गोष्टींची योग्य ती खबरदारी घेत हे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Related Stories

सख्खे शेजारीमध्ये रंगणार अनोखा खेळ

Patil_p

डार्लिंगच्या प्रेमात निखिल चव्हाण

Patil_p

हिरो गायब मोड ऑन मालिकेत धक्कादायक वळण

Patil_p

अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

Rohan_P

… तर ड्रग्ज कनेक्शनचा तपास मुंबई पोलीस करणार : गृहमंत्री

Rohan_P

हिरोपंती 2 मध्ये टायगर-दिशा

tarunbharat
error: Content is protected !!