तरुण भारत

बनगरवाडीत लाखो रुपयांचा गांजा जप्त

एलसीबी व म्हसवड पोलिसांची कारवाई : 7 लाख 89 हजारांचा गांजा सापडला :

प्रतिनिधी/ सातारा

माण तालुक्यातील बनगरवाडीत सातारा स्थानिक गुन्हे शाखा व म्हसवड पोलीस ठाण्याने केलेल्या संयुक्त कारवाईत गांजाच्या शेतावर टाकलेल्या छाप्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 7 लाख 81 हजार 750 रुपये किंमतीचा गांजा तसेच शेतातील गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून या कारवाईने माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बनगरवाडी, ता. माण येथील शिंगाडे नावाच्या शिवारातील शेतात गांजांच्या झाडांची लागवड करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचा आदेश दिला होता.

पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकासह म्हसवड येथे गेले. तिथे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव महामुनी यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व म्हसवड पोलीस ठाण्याचे पथक तसेच तहसिलदार दहिवडी श्रीमती बाई माने यांच्या पथकाने संबंधित शेतावर छापा टाकला. त्यावेळी तिथे तीन व्यक्ती शेतामध्ये गांजाच्या झाडांची पाने तोडत असताना मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सदरची गांजाची झाडे विक्रीसाठी लागवड केली असल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जात 7,81,750 रुपये किमतीचा गांजा मिळून आल्याने त्यांचे विरुध्द म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील पोलीस सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, प्रसन्न जऱहाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, उत्तम दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, संतोष पवार, अर्जुन शिरतोडे, रवि वाघमारे, अजित कर्णे, संजय जाधव, पंकज बेसके, सहायक पोलीस निरीक्षक ए. व्ही. कोळी, पो. कॉ. खटावकर, संतोष माळी, कुंभार, मोहन नाचण, पिंजारी तसेच म्हसवड पोलीस ठाणेकडील काळे, वाघमोडे, काकडे यांनी सहभाग घेतला.

Related Stories

सांगा सांगा फुटपाथ कोणाच्या मालकीचे?

Patil_p

सातार्‍यात शिवजयंती निमित्त कलम 144 लागू

triratna

जिह्याचा वार्षिक पत आराखडा 2020-2021 चा लोकार्पण सोहळा

Patil_p

मृतदेहाला तब्बल २२ तासाने ग्रामसेवकांनी दिला भडाग्नी

triratna

वृक्षारोपणसाठी मुळपीठ डोंगरावर 100 खड्डे तयार!

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर : बुधवारी 39, 544 नव्या रुग्णांची नोंद; 277 मृत्यू

pradnya p
error: Content is protected !!