तरुण भारत

नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत गहू, डाळ देणार; हरियाणा सरकारचा निर्णय

ऑनलाईन टीम / चंदीगड : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. हरियाणा सरकार आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबरपर्यंत गरिबांना मोफत गहू आणि डाळ देणार आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने लॉक डाऊनमध्ये या योजनेअंतर्गत एप्रिल आणि जून महिन्यात गुलाबी, पिवळ्या आणि खाकी रेशनकार्ड धारकांना 5 किलो प्रती सदस्य गहू आणि एक किलो प्रति परिवार डाळ मोफत दिली होती. 


दरम्यान, केंद्र सरकारने मोफत धान्य देण्याचा अवधी नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवला आहे. त्यानंतर आता हरियाणा सरकार देखील आता पुढील पाच महिने गुलाबी, पिवळ्या आणि खाकी रेशनकार्ड धारकांना प्रती सदस्य 5 किलो गहू आणि प्रती परिवार 1 किलो डाळ देणार आहे. 


तसेच जर कुठल्या लाभार्थ्यास रेशन वितरणाबाबत समस्या आल्यास तो लाभार्थी संबंधित जिल्हा खाद्य किंवा रेशन कार्यालयातील सहाय्यता केंद्राच्या टोल फ्रि क्रमांक  1800 180 2087 व 1967 बीएसएनएल वर आपली तक्रार नोंद करू शकतील, असे ही त्यांनी यावेळी सांगितले. 

Related Stories

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 15 पासून

triratna

मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी 2 गुन्हे दाखल : रश्मी करंदीकर

pradnya p

ना‘पाक’ हल्ल्यात 3 जवानांना वीरमरण

Patil_p

एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव

Patil_p

टिकरी सीमेवर शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

datta jadhav

मोदींच्या शासनकाळात आर्थिक विषमतेत वाढ

Patil_p
error: Content is protected !!