तरुण भारत

अमेरिका : हवेत दोन विमानांची धडक; आठ जणांच्या मृत्यूची शक्यता

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेतील इदाहो येथे दोन विमानांची समोरासमोर धडक झाली. दुर्घटनेवेळी दोन्ही विमाने एका तळ्याच्या वर उड्डाण करत असल्याने ही विमाने थेट तळ्यात कोसळून बुडाली. यात आठ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

Advertisements

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इदाहो येथील कोएरी डॅलिन सरोवरावर उड्डाण करत असताना ही विमाने एकमेकांना धडकली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमाने थेट पाण्यात बुडाली. तेथील स्थानिक वेळेनुसार  रविवारी दुपारी 2.20 वाजता ही दुर्घटना घडली. 

दरम्यान, दोन्ही विमाने तळ्यात बुडण्याआधी दोन मृतदेह हाती लागले आहेत. तर इतरांचा शोध स्थानिक प्रशासनाकडून घेतला जात आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मृतांचाही समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Related Stories

कल्याण-डोंबिवलीच्या ‘त्या’ निर्णयास तुर्तास स्थगिती

Rohan_P

अमेरिका : करबचतीसाठी एलन मस्क दुसऱ्या राज्यात मुक्काम हलविणार

datta jadhav

हिमाचल प्रदेशात 23 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 618 वर

Rohan_P

जागतिक संघटनेच्या निवडणुकीत चीनचा पराभव

tarunbharat

ट्रम्प यांनी चीनला डिवचले

Patil_p

‘या’ लसीबाबत संभ्रम कायम; अनेक देशात निर्बंध

datta jadhav
error: Content is protected !!