तरुण भारत

मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न करू नये : खासदार संभाजीराजे

ऑनलाईन टीम

राज्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या सारथी संस्थेवरून वाद सुरू आहे. आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट करत, “मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये,” असं आवाहन केले आहे. सारथी संस्थेसंदर्भात छत्रपती संभाजीराजे सातत्यानं आवाज उठवत असून सारथीचा कारभार सुरुळीत करावा, अशी मागणी करत आहेत.

गेल्या काही काळापासून सारथी संस्थेच्या कामात गोंधळ सुरू असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानेही आक्रमक भूमिका घेत मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर वडेट्टीवार यांनी ओबीसी असल्याने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विट करून दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असं आवाहन केलं आहे.मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही. शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय.

काय म्हणाले मंत्री वडेट्टीवार

“सारथीसाठी मी प्रामाणिकपणे काम करतोय. परंतु, मी ओबीसी समाजातून आलेलो आहे त्यामुळे सतत मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे, असं मला वाटतंय. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सारथीची जबाबदारी मराठा मंत्र्याकडे देण्याची विनंती करणार आहे,” असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

Advertisements

Related Stories

विद्यापीठ विकास आघाडी, सुटाचा सभात्याग

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 122 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

फलटणमध्ये आणखी दोन रूग्ण

Patil_p

महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत, त्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा – संजय राऊत

Abhijeet Shinde

शिवसेना प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Abhijeet Shinde

पाक सरकार खरेदी करणार ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घरे

datta jadhav
error: Content is protected !!