तरुण भारत

इस्रायलने टेहाळणीसाठी सोडला ओफेक -16 उपग्रह

ऑनलाईन टीम / जेरुसलेम : 

शत्रू राष्ट्रांवर देखरेख ठेवण्यासाठी इस्रायलने आज ओफेक-16 हा उपग्रह अवकाशात सोडला. या उपग्रहामुळे इस्रायलच्या टेहाळणी क्षमतेत वाढ होणार आहे.

ओफेक-16 या उपग्रहात शाविट रॉकेटचा वापर करण्यात आला आहे. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने हा उपग्रह बनवला असून, आधुनिक क्षमतेचे इलेक्‍ट्रो ऑप्टीकल रेकन्सिअन्स सॅटेलाईट असे या उपग्रहाचे वर्णन संरक्षण मंत्रालयाने केले आहे. शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्याचे काम हा उपग्रह करेल. विशेष म्हणजे इराणसारख्या प्रबळ शत्रूवर हा उपग्रह लक्ष्य ठेवेल. आठवडाभरातच या उपग्रहाकडून प्रतिमा मिळण्यास सुरुवात होणार आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये जुने युद्ध आहे. देशासाठी कोणत्याही धोक्यावर लक्ष ठेवण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. काही वेळा हा धोका जवळ येतो, तेव्हा त्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असते, असे मंत्रालयाचे अवकाश आणि उपग्रह प्रशासनाचे प्रमुख अमानम हरारे यांनी सांगितले.

Related Stories

‘फास्टॅग’ला आता मुदतवाढ नाही !

Patil_p

भारताने नेपाळला पाठवली 23 टन औषधे

prashant_c

खासदार रवी किशन यांच्या पीए ला कोरोनाची बाधा

pradnya p

पालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू

pradnya p

केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांना कोरोनाची बाधा

pradnya p

काँग्रेस नेता अभिषेक मनु सिंघवी यांना कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!