तरुण भारत

जूनमध्ये 4.27 कोटी ई-वे बिलाचे सादरीकरण

वृत्तसंस्था/ मुंबई 

देशातील व्यापारी व उद्योग क्षेत्रातील तेजी वाढल्याने जीएसटीसोबत अन्य कामगिरीत सकारात्मक बदल पहावयास मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये  जून महिन्यात प्रथम जीएसटी आकडेवारी आणि आता ई-वे बिलाचे सादरीकरण यांच्यात सुधारणा होत असल्याचे पहावयास मिळाले आहे. जीएसटी नेटवर्कने दिलेल्या माहितीनुसार जूनमध्ये एकूण 4.27 कोटी ई-वे बिल सादर करण्यात आली आहेत. हाच आकडा कोविडच्या अगोदर महिन्याला 5.2 कोटींच्या घरात राहिलेला आहे.

Advertisements

कर चोरीला आळा घालण्यासाठी सरकारने ई-वे बिलाची योजना लागू केली आहे. यामध्ये राज्य आणि राज्यांच्या बाहेर जाणाऱया वस्तुंवर हे ई वे बिल लागू केले जाते. यात जर साहित्याची किमत 50 हजार रुपयापेक्षा अधिक असली तरी त्या बिलास साहित्यासोबत ठेवले जाते.  

जीएसटी नेटवर्क आणि सादर करण्यात आलेले आकडे याच्या तुलनेत जूनमध्ये ई वे बिल बनविण्यासाठी 12.40 लाख कोटी रुपयापेक्षा अधिक साहित्याची देवाणघेवाण झाली आहे. या दरम्यान दररोज 14.26 लाख ई वे बिल सादर करण्यात आले आहेत. हा आकडा लॉकडाऊनच्या अगोदरच्या आकडेवारीसोबत मिळत जुळता असल्याचे पहावयास मिळाले असल्याचे सांगितले आहे. म्हणजे जूनमध्ये जवळपास 77 टक्के हिस्सा प्राप्त केला आहे.

Related Stories

कियाच्या सोनेट कार बुकिंगला उत्तम प्रतिसाद

Omkar B

सोनालिका टॅक्टर्सने वॉरंटीत केली वाढ

Patil_p

अरविंद लिमिटेडला झाला तोटा

Patil_p

वेदान्ता बनणार खासगी कंपनी ?

Patil_p

जनधन योजना खाती 43 कोटींवर

Patil_p

ओएनजीसीची इंडियन गॅसमध्ये हिस्सेदारी

Amit Kulkarni
error: Content is protected !!