तरुण भारत

कुवेतमधील 8 लाख भारतीय संकटात

वृत्तसंस्था/ कुवेत सिटी

कुवेतमध्ये स्थलांतरित कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाली आहे. हे विधेयक संमत झाल्यास 8 लाख भारतीयांना आखाती देशातून बाहेर पडावे लागू शकते. प्रस्तावित विधेयकानुसार देशातील भारतीयांचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही. सद्यकाळात तेथे सुमारे 15 लाख भारतीयांचे वास्तव्य आहे. कुवेतची एकूण लोकसंख्या 43 लाख आहे. यातही कुवेतच्या नागरिकांचे प्रमाण 13 लाख असून स्थलांतरितांचा आकडा 30 लाख इतका आहे.

Advertisements

कुवेतच्या नॅशनल असेंबलीच्या कायदाविषयक समितीकडून विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी मिळाली आहे. या विधेयकानुसार भारतीयांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. या तरतुदीमुळे 8 लाख भारतीयांवर कुवेतमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते.

कोरोनामुळे निर्णय

कोरोना महामारीमुळे कुवेतमध्ये विदेशींची संख्या कमी करण्यासंबंधीचा मुद्दा खासदार आणि शासकीय अधिकाऱयांमध्ये जोर पकडू लागला आहे. कुवेतचे पंतप्रधान शेख सबा अल खालिद अल सबा यांनी कुवेतमधील स्थलांतरितांचे प्रमाण 70 टक्क्यांवरून कमी करत लोकसंख्येच्या 30 टक्के करण्याचा प्रस्ताव मागील महिन्यात मांडला होता.

भारताने उचलले पाऊल

भारतीय दूतावासाने 2009 मध्ये इंडियन वर्कर्स वेलफेयर सेंटरची स्थापना केली होती. या केंद्रामध्ये कामगारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची आणि अडचणीत सापडलेल्या भारतीयांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच 24 तास उपलब्ध असलेला टोल फ्री क्रमांक, मोफत कायदेशीर सल्ल्याचे क्लीनिकल व भारतीयांकरता हेल्पडेस्क तयार करण्यात आला आहे.

Related Stories

महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण

pradnya p

महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी : गृहमंत्री

pradnya p

दिल्लीत आज दिवसभरात 1035 नवे कोरोना रुग्ण

pradnya p

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीची हत्या

Patil_p

फेरीवाल्यांमुळे समादेवी गल्लीत वाहतुकीची कोंडी

Patil_p

पालकांना सुटी

Patil_p
error: Content is protected !!