तरुण भारत

विना मास्क फिरणाऱया मनपाच्या अधीक्षकाला ५०० रूपयांचा दंड

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या मोहिमेचा एक महत्वाचा भाग म्हणून शहरात मास्क न वापरणाऱयांना महापालिकेच्या वतीने दंड करण्यात येत आहे. मास्क वापरण्याचा नियम सर्वांसाठी सारखा आहे, त्यातून कुणालाही सवलत नाही, असा संदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी दिला. महापालिकेच्या अस्थापनात अधीक्षक असणारे सागर कांबळे हे विना मास्क फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर आयुक्त डॉ. कलशेट्टी यांन तातडीने जागेवरच कांबळे यांना पाचशे रूपयांचा दंड करण्याचे आदेश दिले.

Advertisements

 आयुक्त डॉ. कलशेट्टी सोमवारी सकाळी महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कार्यालयात येत होत. यावेळी आस्थापन अधीक्षक सागर कांबळे महापालिकेच्या परिसरातील रस्त्यावर विना मास्क फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी तत्काळ त्याच ठिकाणी मास्क वापरण्याचा नियम भंग केल्याबद्दल कांबळे यांना 500 रुपये दंड करण्याचे आदेश आरोग्य निरीक्षकांना दिले. त्याचबरोबर कांबळे यांना मास्क वापरण्याची सूचनाही केली.

कोल्हापूर महानगरपालिकेकडून शहरात मास्क न घालणाऱयांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी महापालिकेचे पथके शहरात फिरत आहेत. एकीकडे नागरीकांवर कडक करवाई केली जाते. तर दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मास्क न घालता फिरत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्याचीही दखल घेत आयुक्तांनी महापालिकेच्या अधीक्षकावर दंडात्मक कारवाई करुन नियम सर्वांना समान असल्याचा संदेश दिला.

Related Stories

कुंभोज येथे महिलांना मारहाण करणाऱ्या वानरांचा ग्रामपंचायतने केला बंदोबस्त

Sumit Tambekar

टाकाऊ वस्तूंपासून पालिकेने साकारला हत्ती

Patil_p

कोरोना पोहोचला मध्यवर्ती बसस्थानकात, वाहतूक विभाग लिपिक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

हातकणंगले पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी पदाचा राजीनामा

Abhijeet Shinde

कोल्हापूर विभागाचा बारावीचा निकाल ९९.६७ टक्के

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती! कोरोना रुग्ण संख्या 32.29 लाख पार

Rohan_P
error: Content is protected !!