तरुण भारत

आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पेट्रोल दरवाढ

प्रतिनिधी/ कराड

कोरोना लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळली असून देशात रोजच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. सरकारी तिजोरीत आलेली आर्थिक तुट भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेलच्या किमती रोज वाढवण्यात येत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

Advertisements

कराड तालुका काँग्रेसच्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ येथील प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. काँगेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुरेश जाधव, अजितराव पाटील चिखलीकर, एनएसयुआयचे सरचिटणीस शिवराज मोरे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मनोहर शिंदे, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे, शहराध्यक्ष राजेंद्र माने, महिला शहराध्यक्षा अर्चना पाटील, अशोकराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ऍड. सुरेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथे धरणे आंदोलन घेण्यात आले होते. ऍड. जाधव यांनी त्यानंतर प्रत्येक तालुक्यात आंदोलन घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराडमध्ये आंदोलन घेण्यात आले. दत्त चौकातून सजवलेल्या बैलगाडीतून प्रशासकीय इमारतीत जाऊन निवेदन देण्यात आली. बैलगाडीत पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष ऍड. जाधव हे बसले होते. प्रशासकीय इमारतीसमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड ढासळलेल्या आहेत. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना फायदा न देता त्यात रोजच वाढ होत आहे. मुळातच डिझेलची किंमत वाढली की शेतकऱयांना तोटा होतो. तरीही सरकार याचा विचार करताना दिसत नाही. उत्पादन शुल्क, एक्साईज कर वाढवून सरकार आपली तिजोरी भरत आहेत. गेल्या सहा वर्षांत पेट्रोल आणि डिझेलमधून प्रचंड प्रमाणात कर सरकारला मिळाला आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून तिजोरीतील तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ केली जात आहे. सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. मात्र सरकार याची उत्तरे देत नाही.

ऍड. सुरेश जाधव म्हणाले की, मोदी सरकार रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवत असून देशाच्या इतिहासात असे घडलेले नाही. सरकारने याबाबत खुलासा करण्याची गरज आहे. दरवाढीविरोधात काँग्रेस प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार आहे.

Related Stories

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; 8.8 अंशावर घसरले तापमान

pradnya p

महाराष्ट्रात रविवारी 11,141 नवे कोरोनाबाधित; 38 मृत्यू

pradnya p

सोलापुरात नवीन 9 कोरोना रुग्ण; संख्या पोहोचली 50 वर – जिल्हाधिकारी

triratna

मराठा आरक्षणप्रश्नी विसंगत ठराव

triratna

राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व: चंद्रकांत पाटील

Shankar_P

जिल्हय़ात ४० बाधितांचा मृत्यू, बळींची संख्या ९०० पार

triratna
error: Content is protected !!