तरुण भारत

पिंपळगावमधील बाजारपेठ, दुकाने सुरू करण्याची मागणी

बाजारपेठ दहा दिवस बंद, पुढील आदेशाची प्रतिक्षा

पिपंळगाव / प्रतिनिधी

Advertisements

भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे  मुंबईहुन आलेल्या एका सहा वर्षीय मुलगीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने गावात प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत गेली दहा दिवस बाजारपेठ व सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गावातील तसेच परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून बाजारपेठ व दुकाने पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे.त्यामुळे सर्वांना प्रशासनाच्या पुढील आदेशाची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

मुंबईहुन आलेल्या तिघांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. चार दिवसांनी स्थानिक दक्षता समितीने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी गारगोटी येथील कोविड सेंटरमध्ये पाठवले होते. दि.२७ रोजी रात्री उशिरा एका सहा वर्षीय मुलगीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला . त्यामुळे मुलगी, आजोबा व आजी या तिघांनाही पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवार दि. २८ रोजी सकाळपासून गावातील बाजारपेठ तसेच एस.टी. स्टँड परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्या कुटुंबियांच्या संपर्कात कोणीही आले नसल्याचे सांगण्यात येते. गावात प्रतिबंधित आदेश लागू करण्यात आला असून पुढील आदेश येईपर्यंत सर्व दुकाने व व्यवहार बंद  आहेत.

Related Stories

शिवराज्यभिषेक दिनी खाकीचेही रक्तदान

triratna

शेतकरी आंदोलनामध्ये चीन आणि पाकिस्तानचा हात : रावसाहेब दानवे

pradnya p

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र शहीद

datta jadhav

सांगली शहरातील विजय नगरमध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण

triratna

कोरोना संपला नाही काळजी घ्या

Patil_p

धनगर समाज शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

triratna
error: Content is protected !!