तरुण भारत

अमेरिकाही घालणार चिनी अ‍ॅप्सवर बंदी

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

भारतानंतर अमेरिकाही आता चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी एका वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली आहे. 

Advertisements

पोम्पिओ म्हणाले, टिकटॉकसह चीनच्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार आम्ही करत आहोत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी या विषयावर अद्याप चर्चा झाली नाही. मात्र, चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार नक्की आहे. चीनला अधिक आर्थिक संधी उपलब्ध करून दिल्याने त्यांना राजकीय स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार मिळतील, हे योग्य नाही. त्यासाठी अमेरिकेला दुसऱ्या मार्गाने जावे लागेल, असेही पोम्पिओ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, पूर्व लडाखच्या सीमावादावरून भारत-चीनमधील तणाव वाढल्याने भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. वापरकर्त्यांच्या माहितीचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे ही बंदी घालण्यात आल्याचे माहिती तंत्रज्ञान खात्याने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. चीनच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारताकडून इतर प्रयत्नही सुरू आहेत.

Related Stories

ब्राझील : संक्रमण गतिमान

Patil_p

चीन-रशिया भागिदारी ब्रिक्ससाठी हिताची

Patil_p

पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांनी दानवेंच्या वक्तव्याची दखल घ्यावी : संजय राऊत

Rohan_P

कलम 370 परत मिळवायचंय : मेहबुबा मुफ्ती

datta jadhav

भारतीय वंशाचे सत्या नाडेला झाले मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष

Rohan_P

कोरोनाची तेल बाजारालाही झळ

prashant_c
error: Content is protected !!