तरुण भारत

पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्याना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

पाकिस्तानचे आरोग्यमंत्री डॉ. जफर मिर्जा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मिर्जा यांनी घरातच स्वतःला क्वारंटाईन केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

Advertisements

मिर्जा यांना मागील आठवड्यात ताप, खोकला अशी लक्षणे आढळली. त्यानंतर ते घरातच वेगळे राहू लागले. त्यांची कोरोना टेस्ट केली असता सोमवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर सध्या घरातच उपचार सुरू असून, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. 

काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 2 लाख 34 हजार 509 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 4839 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 34 हजार 957 कोरोनामुक्त झाले असून, 94 हजार 714 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2306 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Related Stories

धनंजय मुंडेंची कोरोनावर मात; लवकरच मिळणार डिस्चार्ज

Rohan_P

युएईच्या पंतप्रधानांनी घेतली लस

Omkar B

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीनेकडून गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

विमानतळावर चाचणी केंद्र

Patil_p

चीनमध्ये 8 हजार वर्षे जुना पिरॅमिड

Patil_p

हाफिजच्या घराबाहेरील स्फोटप्रकरणी परदेशी नागरिक अटकेत

datta jadhav
error: Content is protected !!