तरुण भारत

2026 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा केंद्रांची निवड लांबणीवर

वृत्तसंस्था/ झुरीच

2026 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या ठिकाणांची निवड कोरोना महामारी परिस्थितीमुळे उशीरा केली जाणार आहे. 2026 ची ही प्रतिष्ठेची स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांत संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे.

Advertisements

सध्या जागतिक स्तरावर कोरोना महामारीमुळे क्रीडा हालचाली स्थगित झाल्या आहेत. तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोना परिस्थितीत काही देशांमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहून त्याठिकाणी पुन्हा क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत. 2026 च्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांची ठिकाणे 2021 च्या मार्चपर्यंत निश्चित केली जातील. दरम्यान या प्रक्रियेला मार्चपासून प्रारंभ होईल. चालू वर्षअखेरीस फिफाचे प्रतिनिधी मंडळ इच्छुक ठिकाणांना भेटी देणार असून त्यांची तपासणी करण्यात येईल, असे फिफाचे स्पर्धा आयोजन समितीचे प्रमुख अधिकारी कॉलीन स्मिथ यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी अमेरिकेतील 17 शहरांची निवड करण्याचे ठरले आहे. पण या शहरांना भेटी दिल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. या स्पर्धेसाठी प्रत्यक्षात कार्यशाळेला गेल्या मार्चमध्येच प्रारंभ केला जाणार होता पण कोरोना संकटामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती.

आता या कार्यशाळेला बुधवारपासून प्रारंभ केला जाणार आहे. या स्पर्धेतील सामन्यांच्या आयोजनासाठी कॅनडा आणि मेक्सिकोमधील तीन शहरांनी तयारी दर्शविली आहे.

Related Stories

‘मी निवृत्त होतेय’: सिंधूच्या पोस्टने खळबळ

Patil_p

मुंबई इंडियन्सला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ रद्द

Patil_p

गावसकर बॉक्सचे उद्घाटन लवकरच

Patil_p

धोनीमुळे आयपीएल अधिक रंगतदार होईल

Patil_p

ब्रिटनचे माजी फुटबॉलपटू हंटर कोरोनाचे बळी

Patil_p
error: Content is protected !!