तरुण भारत

आणखी दोन बॅडमिंटन स्पर्धा रद्द

बीडब्ल्यूएचे घोषणा   चायना मास्टर्स व डच ओपन बॅडमिंटन स्पर्धा न घेण्याचा निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

विश्व बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) या वर्षीच्या सुधारित वेळपत्रकातून चायना मास्टर्स व डच ओपन या आणखी दोन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोव्हिड 19 महामारीच्या कारणास्तव मंगळवारी रद्द केल्याची घोषणा केली आहे.

‘लिंगशुई चायना मास्टर्स 2020 व योनेक्स डच ओपन 2020 या दोन सुपर 100 स्पर्धा या वर्षीच्या सुधारित पत्रकातून रद्द करण्यात आल्या आहेत,’ असे बीडब्ल्यूएफने सांगितले. लिंगशुई चायना मास्टर्स स्पर्धा 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत होणार होती. पण कोव्हिड महामारीमुळे ती दोनदा लांबणीवर टाकण्यात आली होती. ‘सुरुवातीला ती मे महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा लांबणीवर टाकून ती स्पर्धा 25-30 ऑगस्ट कालावधीत घेण्याचे ठरले होते,’ असेही फेडरेशनने सांगितले. डच ओपन स्पर्धा 6 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत नेदरलँड्समधील अल्मीयर येथे घेतली जाणार होती. ‘कोव्हिड महामारीच्या धोक्यामुळे देशाची ही प्रमुख स्पर्धा स्पर्धा रद्द केल्याचे बॅडमिंटन नेदरलँड्सने जाहीर केले आहे,’ असेही विश्व फेडरेशनने स्पष्ट केले.

गेल्या मे मध्ये बीडब्ल्यूएफने उर्वरित मोसमातील स्पर्धांसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले हाते. याशिवाय खेळाडूंनी पात्रता टप्प्यात मिळविलेले मानांकन गुणही कायम ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याआधी बीडब्ल्यूएफने विश्व मानांकन गोठवले होते आणि 17 मार्च रोजी असणारे मानांकन व प्रवेश हे पुन्हा बॅडमिंटन सुरू झाल्यानंतर ग्राहय़ धरले जाईल, असे म्हटले होते.

Related Stories

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या बॅटन रिलेचे उद्घाटन

Patil_p

भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

Patil_p

अर्जेन्टिना-चिली लढत बरोबरीत

Patil_p

संजिता चानूवरील उत्तेजक सेवनाचे आरोप मागे

Patil_p

जोकोविच, थिएम, ओसाका, सेरेनाची विजयी सलामी,

Patil_p

फॉलोऑननंतर पाकिस्तानची सावध सुरुवात

Patil_p
error: Content is protected !!