तरुण भारत

बागलकोट जिल्हय़ात आणखी 26 जणांना कोरोना बाधा

13 जण कोरोना मुक्त

वार्ताहर/ जमखंडी

Advertisements

बागलकोट जिल्हय़ात मंगळवार दि. 7 रोजी आणखी 26 जणांना कोरोना बाधा झाली तर 13 जण कोरोना मुक्त होऊन जिल्हा कोव्हिड हॉस्पिटलमधून घरी परतले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. बाधित संख्या 289 झाली तर बरे झालेल्यांची संख्या 150 वर पोहोचली आहे.

बागलकोट जिल्हय़ातील गुळेदगुड्ड तालुक्यातील घनापूर येथील 30 वर्षाच्या युवकाचा दि. 5 जुलै रोजी मृत्यू झाला होता. त्याचा स्वॅब प्रयोगशाळेला पाठविण्यात आला असता अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ात कोरोनाने बळींची संख्या 7 वर पोहोचली. गोवाहून दि. 2 रोजी परलेल्या या युवकाला ताप व श्वसनाचा त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला होता.

बागलकोट येथे मंगळवारी 6 जणांना तर तालुक्यातील चिक्क मॅगेरी येथे 5, बदामी येथे 4, कलादगीत 4, मुडपपलजीवी येथे 3, गट्टीनूर येथे दोघांना तर जमखंडीत पहिला कोरोना बाधा झाली.

बागलकोट तालुक्यातील मुडलजीवी येथील रुग्ण क्रमांक 10642 या मृत व्यक्तीच्या प्राथमिक संपर्काने त्यांच्या कुटुंबातील 20 वर्षाची युवतीस, 16 वर्षाच्या मुलगीला व त्याच गावच्या 56 वर्षाच्या महिलेला कोरोना बाधा झाली. त्याच प्रमाणे चिक्कमॅगेरी येथील रुग्ण क्रमांक 10173 च्या प्राथमिक संपर्काने 25 वर्षाची महिला, 5 वर्षाची मुलगी, 36 वर्षाची महिला, 11 व 9 वर्षाची मुलगी यांना बाधा झाली आहे.

कलादगी येथील रुग्ण क्रमांक 8709 च्या प्राथमिक संपर्काने 10 वर्षाची मुलगी, 60 वर्षाची महिला व 60 वर्षाचा पुरुष, 34 वर्षाचा पुरुष, बेंगळूरहून बदामी येथे परतलेल्या 33 वर्षाचा पुरुष, पुणेहून हुनगुंद तालुक्यातील मन्नथनाळ येथे परतलेला 11 वर्षाचा मुलगा, गट्टीगनूर येथील 22 वर्षाची युवती, 52 वर्षाची महिला यांना कोरोना बाधा झाली.

बागलकोट विद्यागिरी येथील 78 वर्षाचा वृद्ध, बेंगळूरहून परतलेला 27 वर्षाचा युवक, व त्याच्या संपर्काने 75 वर्षाचा वृद्ध, बेंगळूरहून परतलेला 52 वर्षाचा पुरुष व संपर्काने 46 वर्षाचा पुरुष व 50 वर्षाचा पुरुष बाधित आढळून आले.

जमखंडीचा रुग्ण क्रमांक 10163 च्या संपर्काने दर्गानगर येथील 42 वर्षाच्या पुरुषाला बाधा झाली. बदामी येथील रुग्ण क्रमांक 9153 च्या संपर्काने 25 वर्षाचा युवक, 58 वर्षाचा पुरुष बाधित झाला.

अद्याप 1116 अहवाल येणे बाकी आहेत. जिल्हय़ात 13 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यात जमखंडीचा 1, बागलकोट नवनगर येथील 1, मुधोळ तालुक्यातील बरगी येथील 2, बदामी तालुक्यातील मणिनागर येथील 1, कलादगी 5, जमखंडीतील कुंचनूर येथील 3 असे 13 रुग्ण बरे झाले.

Related Stories

मराठी भाषिक तरुण पोलिसांकडून टार्गेट

Amit Kulkarni

निकालानंतर अधिकाऱयांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Patil_p

मुलांना नाहक चोरी प्रकरणात गोवल्याचा आरोप

Patil_p

टाकाऊ वस्तूंपासून तरुणांनी बनविले विमान

Omkar B

खानापूर तालुक्मयात दहावीचा पहिला पेपर सुरळीत

Patil_p

मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये कै.बाबुराव ठाकुर स्मृतिदिनाचे आचरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!