तरुण भारत

हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 1083 वर

ऑनलाईन टीम / शिमला : 


हिमाचल प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाने जोर धरला असून मंगळवारी ऊनामध्ये 2, शिमला मध्ये 2, कांगडा आणि सोलन जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गरली रक्कड मधील 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती 4 जुलै रोजी केरळमधून आली होती आणि आता या व्यक्तीला कोविड केअर सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. तर बद्दीमधील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. ही व्यक्ती नुकताच उत्तर प्रदेशातून आली होती. सोलन जिल्ह्यातील दोन व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisements

जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 42 सक्रिय रुग्ण आहेत. ऊना जिल्ह्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली असून यातील एक जण झारखंडमधून आलेला 22 वर्षीय युवक असून त्याला रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर दुसरा रुग्ण अंब मधील रिपोह  मिसरा येथिल 38 वर्षीय युवक असून तो मुंबईतून आला होता. हा संस्थात्मक क्वारंटाईन होता. शिमला जिल्ह्यात देखील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे रामपूर क्षेत्रातील असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. ते नुकतेच हैदराबाद मधून आले होते. 


दरम्यान, हिमाचल प्रदेशामध्ये कोरोना रुग्णांची एकूूण संख्या 1083 वर पोहोचली असून 282 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर  777 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

दलाई लामांना भेटले सरसंघचालक

Patil_p

चिदंबरम पिता-पुत्रांना न्यायालयाचे समन्स

Patil_p

एनपीआरचे नवे स्वरुप अमान्य : नितीश

Patil_p

कर्नाटक: चित्रदुर्गच्या ‘या’ खासदाराची पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात लागणार वर्णी

Abhijeet Shinde

लखीमपूर खेरी साक्षीदारांना संरक्षण द्या !

Patil_p

हवाई दलप्रमुख फ्रान्स दौऱयावर

Patil_p
error: Content is protected !!