तरुण भारत

भारतीय सैनिकांनी काश्मिरमध्ये केली ‘दगडूशेठ’ गणपतीची स्थापना

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणा-या भारतीय लष्करातील 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली. 

Advertisements


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर सर्वदूर पसरलेली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोप-यातून भाविक पुण्यात येतात. त्यामुळे श्रीं च्या दर्शनासाठी येणाऱ्या 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याकरीता कमांडिंग ऑफिसर कर्नल विनोद पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे विनंती करणारे पत्र ट्रस्टला पाठविले होते. 


त्यानुसार दगडूशेठ ट्रस्टने सैनिकांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले आणि काही दिवसांपूर्वी ही मूर्ती रेल्वेने काश्मिरकडे रवाना झाली होती. कर्नल विनोद पाटील यांनी या संकल्पनेची व मंदिराची मुहूर्तमेढ नोव्हेंबर 2019 मध्ये रोवली होती. 


कर्नल विनोद पाटील यांनी पत्रात म्हटले की, मंदिर उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी मनापासून व उत्साहाने योगदान दिले. मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली तेव्हा मंदिराच्या जागेवर जवळजवळ 4 ते 5 फूट इतका बर्फ होता. पुढे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान हा बर्फ 12 फुटांपर्यंत वाढत गेला. परंतु जवानांनी श्रीं चे काम प्राथमिक कर्तव्य समजून कामाला सुरुवात केली. जवानांनी त्याकरीता आर्थिक योगदानही दिले. मंदिराच्या सुशोभिकरणामध्ये चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम आहे. मंदिरात दररोज पूजा व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. दगडूशेठ गणपतीच्या प्रतिकृतीचे दर्शन घेऊन जवानांच्या शौर्यात वृद्धी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

Related Stories

लॉकडाऊनमुळे निर्यातीची ९ लाख टन साखर अडकली

prashant_c

क्रिप्टोकरेन्सीत भाडे घेणारा रिक्षावाला

Amit Kulkarni

भटक्या श्वानांचा ‘रॉबिनहुड’

Amit Kulkarni

विराट – अनुष्काने एक लहान मुलाच्या उपचारासाठी जमा केले 16 कोटी

Rohan_P

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

Rohan_P

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

prashant_c
error: Content is protected !!