तरुण भारत

राजगृहावरील तोडफोड प्रकरणी सोलापुरात निदर्शने

भीमसैनिकांकडून घटनेचा निषेध

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’ वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान आज बुधवारी सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भीमसैनिकांच्या वतीने काळे झेंडे दाखवून, घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली.

राज्यासह सोलापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान आज बुधवारी सोलापुरातील सर्व पक्षातील भीमसैनिकांनी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. काळे झेंडे हातात घेऊन तोडफोड करण्यावर कारवाई करा, जय भीम, जय भीम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सोहन लोंढे, आतिष बनसोडे, आरपीआयचे प्रमोद गायकवाड त्याचबरोबर भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोपींना तातडीने अटक करावी, कठोर शिक्षा द्यावी : नगरसेवक, आनंद चंदनशिवे
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. वारंवार दलितांवर अन्याय होत आहे, आज आमच्या अस्मितेवर हल्ला करण्यात आला आहे. आम्ही खपवून घेणार नाही. तातडीने हल्ले करणा-या अटक करून कठोर कारवाई करावी, आंबेडकर कुटुंबीयांना कायम स्वरुपी सुरक्षा द्यावी.

Related Stories

राममंदिराला अक्षयतृतीयेचा मुहुर्त ?

prashant_c

”पंजा फक्त टायगरकडे असतो अन् तो आता काँग्रेसमय झाला आहे”

Abhijeet Shinde

परिट सेवा मंडळाचा समाजभूषण आणि अष्टपैलू पुरस्कार जाहीर

Rohan_P

सोलापूर शहरात आज 29 पॉझिटिव्ह, उपचारा दरम्यान 2 मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४६२ नवे कोरोना पॉझिटिव्ह, १३ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीजचोरी विरोधात मोहीम आणखी तीव्र करा : नाळे

Rohan_P
error: Content is protected !!