तरुण भारत

विद्यार्थ्यांना घरपोच पाठयपुस्तके द्या : आपची मागणी

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळाअद्यापही सुरु केलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र सुरु झालेले नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळांना ऑनलाईन वर्ग घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोना महामारी दरम्यान 2020-21 शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग सुरू असल्याने, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तके घरपोच द्यावीत अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) कर्नाटक सरकारला केली आहे.

कर्नाटक पाठयपुस्तक विभागाने विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरुपात पाठ्यपुस्तके उपलब्ध करुन दिली आहेत. परंतु अद्यापही विद्यर्थी आणि शिक्षक पारंपारिक छापील पाठ्यपुस्तकांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांना पीडीएफ उपलब्ध करून दिल्या असली तरी त्यातील बर्‍याच विद्यार्थ्यांना पीडीएफ वापरणे सोयीस्कर होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोयीस्कर व्हावे यासाठी पाठ्य पुस्तकांच्या छापील प्रति विद्यार्थ्यांना घरपोच द्याव्यात अशी मागणी आम आदमी पार्टीने कर्नाटक सरकारकडे केली आहे.

Advertisements

Related Stories

नदीत आत्महत्येचा महिलेचा प्रयत्न

Omkar B

नरवीर चषक स्पर्धेत फॉरेव्हर संघाला जेतेपद

Amit Kulkarni

बेळगाव दक्षिण विभागात ग़्17 ठिकाणी अबकारी छापे

Omkar B

बकरी-ईद दिवशी गो-हत्या होणार नाही

Amit Kulkarni

हवालदार ए. एन. तुक्कार यांना मुख्यमंत्री पदक बहाल

Amit Kulkarni

वापरात नसलेल्या वाहनांचे परवाने होणार रद्द

Patil_p
error: Content is protected !!