तरुण भारत

पन्हाळा – बुधवारपेठ रस्त्यावर दरडीतील दगड कोसळल्याने भितीचे वातवरण

पावसामुळे दगडी शिळा कोसळण्याचा धोका वाढला
पुन्हा रस्ता बंदची पुनराव्रुत्ती होण्याची शक्यता

प्रतिनिधी / पन्हाळा

पन्हाळा-बुधवारपेठ दरम्यान असलेला रस्ता गेल्यावर्षी पासुन नेहमीच चर्चेत राहिला आहे.या रस्त्याच्या एका बाजुला खोल दरी तर एका बाजुला उंच-उंच दगडी शिळा आहेत. सध्या पन्हाळ्यासह परिसरात धुवाँधार पाऊस सुरु आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावासाने दगडी शिळामधुन काही दगड या रस्त्यावर येवुन पडल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.पहिल्याच पावसात अशा प्रकार झाल्याने भविष्यात दगडी शिळा मोठा धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी पुन्हा पन्हाळा रस्ता बंद होण्याची पुनराव्रुत्ती होईल का याकडे लक्ष लागुन राहिले आहे.

Advertisements

पन्हाळा ते बुधवार पेठ दरम्यान असेलला रस्ता गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात खचला. पन्हाळ्याला जोडणारा हा एकेमव रस्ता असल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. पन्हाळावासियांना जणू इतिहासकालीन काळाची आठवण झाल्यासारखे नजरकैदेत राहण्याचा प्रसंग आला. सदरच्या रस्त्याचे महत्त्व समजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम सुरु केले. सध्या रस्त्याचे काम पुर्ण झाले असले तरी या रस्त्यावरील एकाबाजूस असलेल्या डोंगरातून दगडी शिळांनी आपली मूळ जागा सोडली आहे. आज रात्री झालेल्या गडावर मुसळधार पावसाने डोंगरातील काही दगड रस्त्यावर आले खरे पण सुदैवाने यावेळी रस्त्यावर वाहतुक नसल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. याप्रकाराने रस्त्यावर दरडीचा धोका अधिकच वाढला आहे. या दगडी शिळा कधी खाली सरकून रस्ता बंद होईल आणि जिवीतहानी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सध्या या रस्त्यावरील वाहतुक भितीच्या छायेखाली सुरु आहे.

Related Stories

सह्याद्री हॉस्पीटलमधील सहा जण झाले कोरोना मुक्त

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दाऊद इब्राहिम सोलापूरे यांचे निधन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ऐनीत आठ शेतकऱ्यांच्या घरवजा गोठ्यांना आग

Abhijeet Shinde

संजय भोसलेंना बडतर्फ करा अन्यथा महापालिकेच्या दारात उपोषण; नगसेवक भूपाल शेटे यांचा इशारा

Abhijeet Shinde

वंदनगडावर शिववंदनेश्वर प्रतिष्ठानने केले शिवकार्य

Patil_p

सोलापूर शहरात तब्बल १०२ कोरोना पॉझिटीव्ह, दोन जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!