तरुण भारत

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे झाले क्वारंटाइन

ऑनलाईन टीम / मुंबई : 


देशात कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढण्याच्या संख्येने जोर धरला आहे. सामान्य लोकांबरोबर राजकीय नेत्यांनाही या कोरोनाने वेढले आहे. 

Advertisements


आता राष्ट्रवादीचे नेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संपर्कात आल्याने त्यांनी असा निर्णय घेतला अशी माहिती स्वतः अमोल कोल्हे यांनी ट्विटर अकाउंट वर दिली आहे. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, जय शिवराय!नमस्कार…,आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे. एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 


पुढे ते म्हणाले, मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.


त्याचबरोबर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून विकासकामांमध्ये कुठे खंड पडू देणार नाही. काही अडचण असल्यास आपण मला सोशल मीडियाच्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर अथवा संपर्क कार्यालय मध्ये संपर्क करू शकता, धन्यवाद. असे डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, याआधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनी यावर यशस्वीरित्या मात केली आहे. 

Related Stories

आम आदमी पक्षाचे माजी आमदार जरनैल सिंह यांचे कोरोनामुळे निधन

Rohan_P

दयाकुंडी प्रांतात तालिबानी हत्याकांड

datta jadhav

लातूर : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण; मुलालाही संसर्ग

Rohan_P

TokyoOlympics: 28 मिनिटात सिंधू विजयी; इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव

Abhijeet Shinde

“तुम्ही देशाची रक्षा करण्यास असमर्थ”; राहुल गांधींची मोदींवर टीका

Abhijeet Shinde

उस्मानाबाद : चिखलीतील पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!