तरुण भारत

कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचा आक्रोश, महावितरणचे मौन

प्रतिनिधी / कोल्हापूर

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेच्यावतीने 15 जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरु आहे. चौथ्या टप्प्यात मंगळवारपासून (7 जुलै) महावितरणमधील 750 तर महापारेषणमधील 100 कंत्राटी कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसऱया दिवशी बुधवारी दुपारी सर्व कर्मचाऱयांनी महावितरणच्या परिमंडल कार्यालयासमोर निदर्शने करून शासनाचा निषेध केला. पण वीज कर्मचाऱयांच्या मागण्यांकडे आणि त्यांच्या आक्रोशाकडे महावितरणने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Advertisements

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील हजारो वीज कंत्राटी कामगारांनी अनेक नैसर्गिक आपत्तीमध्येही वीज पुरवठा अखंडीत ठेवला आहे. ही सेवा बजावात असताना 15 कंत्राटी कर्मचारी दगावले. तर 20 कामगार गंभीर जखमी झाले. पण या कामगारांना वेळेवर किमान वेतनासह दिवाळीचा बोनसदेखील मिळालेला नाही. सॅनिटायझरसाठी मंजूर 1 हजार रूपयांचे अनुदान अनेकांना मिळालेले नाही. याऊलट ठेकेदारांनी कंत्राटी कर्मचाऱयांच्या पगारातून हजारो रूपये अनिधिकृत काढून घेतात. याबाबत तक्रार देणाऱया कर्मचाऱयांना कामावरून बंद केले जाते. कोरोना महामारीच्या काळात वीज कंपन्या अथवा ठेकेदारांनी सुरक्षिततेची कोणतीही साधने दिलेली नाही. अपघात झाल्यास अर्थिक मदतीची तरतूद नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱयांनी चार टप्प्यात आंदोलन केले जात आहे. आता चौथ्या टप्प्यात सर्व कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनात अमर लोहार यांच्यासह सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी होते.

महावितरणच्या तांत्रिक कामावर परिणाम
जिह्यात 750 कंत्राटी वीज कर्मचारी आहेत. या कर्मचाऱयांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन केल्यामुळे महावितरणचे तांत्रिक कामकाज ठप्प झाले आहे. आणखी काही दिवस आंदोलन सुरु राहिल्यास ऐन पावसाळ्याच्या काळात देखभाल दुरुस्तीची कामे रेंगाळणार असून त्याचा ग्राहकांना फटका बसणार आहे.

Related Stories

संजय राऊत कार्टुन शेअर करत म्हणतात पत्रकार ‘फ्रन्ट लाईन वर्करच’

Abhijeet Shinde

आजर्‍यातील मोरेवाडी धनगरवाड्यात आठवड्यात 4 म्हैशींचा मृत्यू

Abhijeet Shinde

नेहरू-वाजपेयी आदर्श नेते; सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज – नितीन गडकरी

Abhijeet Shinde

अंतिम वर्षाची परिक्षा असणार बहुपर्यायी स्वरुपाची

Abhijeet Shinde

अनिल देशमुखांना ईडी चौकशीला सामोरे जाऊन तुरुंगात जाव लागणार – किरीट सोमय्या

Abhijeet Shinde

हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!