तरुण भारत

मारुती कंपनीने रेल्वेतून पाठविल्या 6.7 लाख कार्स

ट्रकच्या लाखो फेऱयांची बचत : मार्च 2014 पासून रेल्वेद्वारे कार्स पाठवण्यास प्रारंभ

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisements

देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने मागील सहा वर्षामध्ये भारतीय रेल्वेच्या माध्यमातून 6.7 लाख कार्स देशातील विविध भागांमध्ये विक्रीसाठी पाठविल्या आहेत. यामुळे कंपनीने या दरम्यान 18 टक्केपेक्षा अधिकच्या सीएजीआयरची नोंद केली आहे.

कंपनीने मार्च 2014 मध्ये डबल डेकर फ्लेक्सी डेक रॅकच्या मदतीने आपल्या कार्सची पहिली फेरी पाठवून दिली होती. या कार्स पाठविण्याला वेग देत कंपनीने दिवसागणिक ती वाढवत नेल्याची माहिती असून देशातील विविध भागांमध्ये रेल्वेचा वापर करुन जवळपास 3000 मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यास मदत मिळाली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या दरम्यान 1.78 लाखपेक्षा अधिक कार्सना रेल्वेद्वारे पाठविण्यात आले आहे. जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 15 टक्के अधिक राहिले आहे. चालू वर्षात कंपनीची एकूण विक्री 12 टक्क्मयांवर राहिली आहे.

इंधनाची बचत

सदर कार्स अन्य ट्रक्स वा अन्य अवजड वाहनांच्या मदतीने पाठविल्या असत्या तर जवळपास 10 कोटी लिटर इंधनाचा खर्च करावा लागला असता. परंतु इतक्मया कोटी लिटरच्या इंधनाची बचत करण्यासोबतच ट्रकच्या राष्ट्रीय राज्यमार्गावरील एक लाखापेक्षा अधिकच्या फेऱयांची बचत झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

वितरणावर भर

आम्हाला आता वाढती विक्री लक्षात घेता आगामी काळात मोठय़ा प्रमाणात लॉजिस्टीक्सची गरज निर्माण होणार असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मारुती सुझुकीचे एमडी आणि सीईओ केनिची आयुकावा यांनी म्हटले आहे.

Related Stories

अलिबाबा मेगा सेलमध्ये 56 अब्ज डॉलर्सची ऑर्डर प्राप्त

Omkar B

प्रवासी वाहनांची विक्री घटली

Patil_p

हिंदुस्थान पेट्रोलियमची सोने जिंकण्याची ऑफर

Patil_p

लहान व्यवसायांसाठी फेसबुकचे 32 कोटींचे अनुदान

Patil_p

‘पेटीएम’ची थेट विदेशातून पैसे पाठविण्याची सुविधा

Patil_p

बँक ऑफ बडोदाचे कर्ज झाले स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!