तरुण भारत

टाटा मोटर्सची खास सवलत योजना

नवी दिल्ली 

 कोरोना संकटाच्या कारणामुळे वाहन क्षेत्र फार मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले आहे. यामध्ये ऑटोमोबाईल कंपन्या विविध प्रकारच्या सवलत योजना सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामधून ग्राहकांना लाभ मिळून कंपन्यांची वाहन विक्रीही सुरु राहण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये देशातील दिग्गज वाहन कंपनी टाटा मोटर्सने गाडी खरेदीवर सहा महिन्यांपर्यंत इएमआय मुक्त योजना लागू करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सदर कालावधीदरम्यान ग्राहकांना फक्त हप्त्याचे व्याज द्यावे लागेल. ही सवलत टाटाकडून टीगो, नेक्सॉन आणि अल्ट्रोज यासारख्या कारसाठी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements

ग्राहकांकडे कमीत कमी पैसे असल्यास कंपनीकडून ऑन रोड 100 टक्के फंडिग आणि शुन्य डाऊन पेमेंटची सुविधाही दिली जाणार आहे. यासाठी टाटाने करुर वैश्य बँकेसोबत करार केला आहे. या प्रकारेच पाच वर्षापेक्षा अधिक काळासाठी कर्ज हवे असल्यास अन्य फायनान्शिअल संस्थांसोबत करार केला आहे.

Related Stories

कालानुरूप ‘हे’ पाच बदल करण्याची गरज

tarunbharat

जोडा विघडला बंधूंचा

Patil_p

आणि रावळगाव

Patil_p

गोविंदा आला रे

Patil_p

वायुदलाचे सामर्थ्य वाढणार

Patil_p

मराठी भाषा संपेल ही भीती निरर्थक

Patil_p
error: Content is protected !!