तरुण भारत

चित्रपट महामंडळाचा धनादेश चोरून भरला उपाध्यक्षांच्या खात्यावर

संशयितावर कारवाईबाबत राजवाडा पोलिसांना निवेदन

प्रतिनिधी/कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये कुरघोडीच्‍या राजकारणाला ऊत आला आहे. दोन दिवसापूर्वी महामंडळाच्या कार्यालयातून दोन लाखांचा धनादेश चोरून तो थेट उपाध्यक्षांच्या खात्यावरच भरण्यात आला. ही घटना उजेडात आल्यानंतर उपाध्यक्षांनी आपल्यावरच कुरघोडीचे राजकारण होत असल्याचे जाणून ताबडतोब दोन लाखाची रक्कम महामंडळाच्या खात्याकडे वर्ग केली. तसेच बुधवारी सायंकाळी राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित अर्जुन नलावडे यांच्या बाबत निवेदन देऊन त्यांची चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये गेली काही वर्षे कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. दोन गटातील राजकारण आता शिगेला पोहचले आहे. चित्रपट महामंडळाने रेल्वे स्टेशनसमोरील नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये कार्यालय खरेदी केले आहे. तेथे फर्निचरचे काम सुरु असून त्यासाठी रक्कम खर्ची पडणार आहे. महामंडळाच्या खजानिस पदी निवडून आलेले संजय दुबे हे पुणे ते वास्तव्य करतात. त्यांनी या कामाकरिता आपल्या अधिकारात सह्यांचे धनादेश कोल्हापुरातील कार्यालयात पाठवले होते. हे धनादेश देवल क्लब येथील जुन्या कार्यालयातील तिजोरीमध्ये ठेवले होते.

दोन ते तीन दिवसांपूर्वी तिजोरीतील हे धनादेश अज्ञाताने चोरले होते. याबाबत उपाध्यक्ष धनाजी यमकर, संस्थेचे कार्यालयीन हिशेब पाहणारे रवींद्र बोरगावकर यांना माहिती नव्हती. दरम्यान ६ जुलै रोजी आयडीबीआय बँकेच्या खात्यावर २ लाख रुपये जमा झाल्याचा मॅसेज महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांना मोबाईलवर प्राप्त झाला. त्या मॅसेजमध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाव असल्यामुळे यमकर यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब दोन लाखाची रक्कम महामंडळाच्या सारस्वत बँकेच्या खात्यावर वर्ग केली. त्याची पावती जपून ठेवली. बँकेत जाऊन चेक वरचे हस्ताक्षर तपासून पाहिले. त्यावर अर्जुन नलावडे यांचे हस्ताक्षर असल्याचा संशय यमकर यांना आला. या विषयी त्यांनी काही सहकाऱ्यांना माहिती दिली आणि बुधवारी सायंकाळी थेट राजवाडा पोलीस ठाण्यात जावून प्रशासकीय अधिकारी अर्जुन नलावडे यांनीच हा चेक चोरल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत उपाध्यक्ष धनाजी यमकर, सुरेंद्र पाटील, रविंद्र बोरगांवकर यांच्यासह चार जणांनी राजवाडा पोलिसांना निवेदन दिले आहे.

संशयितांवर कारवाई व्हावी – उपाध्यक्ष यमकर

महामंडळाच्या कार्यालयात प्रशासन अधिकारी अर्जुन नलवडे येतात. त्यांनीच हे चेक चोरल्याचा आरोप उपाध्यक्ष यमकर यांनी केला. तो चेक खात्यावर भरून बदनाम करण्याचा डाव असल्याचे यमकर यांनी सांगितले. याबाबत राजवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक योगेश पाटील यांना निवेदन देवून त्यांना वस्तुस्थिती सांगितली. त्यावर उपनिरिक्षक योगेश पाटील यांनी तात्काळ अर्जुन नलवडे यांना फोनवरून संपर्क करून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Related Stories

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’ हवे की नको … दोन मतप्रवाह!

triratna

पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीच्या कामांना वेग

Patil_p

वीज बिलावर दोन दिवसात निर्णय घ्या : राज ठाकरे

pradnya p

कोल्हापूर : यंदा ढोल-ताशा वाजलाच नाही

Shankar_P

कास रस्त्यावर कार दरीत कोसळून युवती ठार

Patil_p

नंदगाव येथे जमिनीच्या वादातून एकाचा मृत्यू

triratna
error: Content is protected !!