तरुण भारत

पत्नीचा छळ केल्याप्रकरणी : पोलीस उपनिरीक्षकासह सासू, ननंद, मित्रावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/वारणानगर

लग्न झाल्यापासून पत्नीसोबत अनैसर्गिक शारिरीक सबंध ठेवण्यासाठी मारहाण, मित्रासोबत विनयभंग, माहेरहून मोटर सायकल व सोन्याची अंगठी देण्यासाठी सासू व ननंद यांच्या सांगण्यावरून होणारा छळ केल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मित्रासह सासू ननंद अशा चौघावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप निवृत्ती सुर्यवंशी, सासु मालन, मित्र संतोष अनुशे (सर्व रा. काखे ता.पन्हाळा) व ननंद सुवर्णा काळे (रा. पोवार कॉलनी,पाचगांव, कोल्हापूर) अशा चौघां विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक झालेली नाही.

सुर्यवंशी डहाणू ता. पालघर येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचा विवाह झाला आहे. पत्नीला नोकरीच्या ठिकाणी घेवून गेल्यावर संसाराला सुरवात झाल्यावर त्याने ब्ल्यू फिल्म दाखवत आपले प्रताप दाखवायला सुरवात केली. तर बहिण सुवर्णा सांगेल तसा पत्नीला त्रास देत होता. रोजची शिवीगाळ मारहाण सुरू असताना डहाणू येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यानी देखील अनेक वेळा हा वाद मिटवला तरी देखील संदीपचे त्रास देणे थांबेना. अशातच जवळचा मित्र संतोष अनुशे याला बोलवून स्वताच्या पत्नीला त्रास देण्यासाठी वारंवार तो मित्राला घरी बसवत होता. याप्रकरणी या चौघां विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, फौजदार नरेद्र पाटील करीत आहेत.

Related Stories

तासगाव तालुक्यात एका गावात एक रूग्ण

Abhijeet Shinde

सोसताही येईना, सांगताही येईना

Patil_p

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा

Abhijeet Shinde

सांगली : कोरोनाचा सतरावा बळी, नवे 15 रूग्ण

Abhijeet Shinde

लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही; राजेश टोपेंनी स्पष्ट केली भूमिका

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अठरा वर्षांवरील सर्वांना मिळणार लस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!