तरुण भारत

पाकिस्तानच्या गोळीबारात महिलेचा मृत्यू

शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच : भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisements

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेनजीक बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन पेले आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे. नियंत्रण रेषेनजीक पुंछ जिल्हय़ातील गावांना लक्ष्य करत पाकिस्तानी सैन्याने पहाटे 3 वाजता गोळीबार सुरू केला होता.

रेशम बी आणि हाकम बी या दोन वृद्ध महिलांना गोळय़ा लागल्या आहेत. रेशम बी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे 45 मिनिटांनी पाकिस्तानने गोळीबार थांबविला आहे. गोळीबाराचे प्रमाण अधिक असल्याने जखमींना हलविण्यासाठी 8 रुग्णवाहिका पाठवाव्या लागल्याची माहिती मंधेरचे आरोग्याधिकारी डॉक्टर परवेझ यांनी दिली आहे.

5 जुलै रोजी पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग केला होता. पाकच्या गोळीबारात एक सैनिक हुतात्मा झाला होता. तर 10 जून रोजी राजौरी सेक्टरमध्ये एका सैनिकाला हौतात्म्य प्राप्त झाले होते. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन होण्याचे प्रमाण यंदा वाढले आहे. केवळ जून महिन्यातच पाकिस्तानने 411 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन पेले आहे. चालू वर्षात आतापर्यंत 2,300 वेळा शस्त्रसंधी उल्लंघन झाले आहे. मागील वर्षी हा आकडा 3,168 तर 2018 मध्ये 1,629 इतका राहिला होता.

Related Stories

भारत होत आहे रॅनसमवेअरचा शिकार

Patil_p

संजदच्या बैठकीपासून प्रशांत किशोर दूर

Patil_p

80 वर्षी वृद्धेचा कोरोनावर विजय

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

datta jadhav

दिल्लीत बाधितांची संख्या 6.80 लाखांच्या उंबरठ्यावर!

Rohan_P

गुजरातमधील राजकोटमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Rohan_P
error: Content is protected !!