तरुण भारत

शाहूपुरी पोलिसांची 34 दुचाकी चालकांवर कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुचाकीवर एका व्यक्तीलाच बसण्याची परवानगी असताना जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन डबलसीट प्रवास करणाऱया 34 दुचाकी चालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली.

Advertisements

मंगळवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुमारास जुना आरटीओ चौकात दुचाकीवर डबलसीट प्रवास करणाऱया महेश शिंदे (रा. कूपर कॉलनी, सातारा), परशुराम दिनकर शेलार (रा. म्हसवे, ता. सातारा), श्रीकांत संजय माने (रा. संगमनगर, सातारा), उमेश प्रकाश साळुंखे (रा. जयविजय हौसिंग सोसायटी, सातारा) सुरेश बळीराम जमदाडे, शुभम हणमंत निंबाळकर हे दुचाकीवर डबलसीट प्रवास करत असताना आढळून आल्याने त्यांची दुचाकी जप्त करण्यात आली.

राधिका सिग्नल चौकानजिक निलेश शिवाजी शेलार, योगेश रवींद्र क्षीरसागर, सुरज विजय विभुते, अमोल पुंडलिक भिसे, अरविंद अर्जुन फाळके, विनय विष्णू सावंत, सुनील निवृत्ती सकटे, अमोल श्रीरंग धनवडे, अमोल नारायण घोरपडे यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. वाढे फाटा येथे अनिल इनामदार, अक्षय महेंद्र पवार, अक्षय फळके, अमित कांबळे, विलास चव्हाण, राहुल सकुंडे, सुनील बर्गे, समीर शिंदे, अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मोती चौक परिसरामध्ये संकेत शशिकांत धनवडे, सुरज विलास कुंभार, सागर प्रदीप साळुंखे यांची वाहने जप्त करण्यात आली. मोळाचा ओढा येथे श्रीकृष्ण जनार्दन पवार, अनिकेत आनंदा गलांडे, प्रथमेश संजय चिंचकर, शुभम शशिकांत फडतरे यांच्या वाहनावर कारवाई करण्यात आली. याबाबत हवालदार राजू जाधव यांनी तक्रार दिली असून हवालदार कुंभार पुढील तपास करत आहेत.

Related Stories

क्लासेस् फॉर कॉमर्स करियर तर्फे ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

triratna

सातारा : जुंगटी ते कात्रेवाडी रस्ता होण्यासाठी युवकांनी गाठला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईतील जनता दरबार

triratna

सोनजाई डोंगरावर दोन हजार वर्षापूर्वीची लेणी उजेडात

datta jadhav

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 18 लाख 32 हजार 176 वर

pradnya p

छत्रपती शिवाजी महाराज कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

triratna

सातारा पोलिसांचा रेझिंग डे साजरा

Patil_p
error: Content is protected !!