तरुण भारत

समर्थनगर परिसरातील डेनेज वाहिन्या तुंबण्याचे प्रकार

प्रतिनिधी/ बेळगाव

शहर स्वच्छ बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आटापिटा चालविला आहे. मात्र, जुना धारवाड रोड परिसरातील समर्थनगर वसाहतीमध्ये सांडपाण्याची वाहिनी तुंबल्याने अस्वच्छता पसरली आहे. रहिवाशांच्या स्वच्छतागृहात पाणी येत असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. यामुळे विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून स्मार्ट सिटी बनविण्याचा प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisements

सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने नव्याने डेनेज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. मात्र, समर्थनगर परिसरातील समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जुना धारवाड रोडवरील समर्थनगर वसाहतीमध्ये सांडपाण्याची वाहिनी खराब झाली आहे. परिणामी सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हे सांडपाणी रस्त्यावरून आणि गटारींमधून वाहत असून, परिसरात राहणाऱया रहिवाशांना याची डोकेदुखी झाली आहे. सांडपाणी रस्त्यावर साचून राहिल्याने नागरिकांना ये-जा करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, दुर्गंधी पसरली आहे. काही नागरिकांच्या घरांमध्ये सांडपाणी शिरले आहे. अर्धा तास पाऊस झाला की काही नागरिकांच्या स्वच्छतागृहामधून सांडपाणी ओव्हरफ्लो होत असून रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. पण याची दखल घेण्यात आली नाही. डेनेज वाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सांडपाणी गटारीत साचले आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विविध आजारांचा सामना करावा लागत असल्याने येथील समस्येचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. 

Related Stories

कुस्ती मैदान पूजनाने बेडकिहाळ दसरा महोत्सवाची सांगता

Patil_p

लोंढा वन अधिकाऱयाकडून बाबुराव देसाईंना पिस्तूलचा धाक

Amit Kulkarni

मध्यरात्री शेतवडीत ट्रक क्लिनरचा खून

Patil_p

अंगडी स्कूल ऑफ आर्किटेक्चरचा पहिला पदवीदान समारंभ उत्साहात

Amit Kulkarni

कोरोनाने विमान प्रवाशांची संख्या रोडावली

Amit Kulkarni

कोतवाल गल्लीतील स्वच्छतेसाठी 20 वर्षांपासून तक्रार

Omkar B
error: Content is protected !!